घरताज्या घडामोडीमॉडेलिंगचे आमिष दाखवून बलात्कार; व्हिडीओ व्हायरलची धमकी देत लुटले दागिने

मॉडेलिंगचे आमिष दाखवून बलात्कार; व्हिडीओ व्हायरलची धमकी देत लुटले दागिने

Subscribe

मॉडेलिंगचे आमिष दाखवत एकाने गुंगीचे औषध देत शुटिंग करुन ते सोशल मीडियासह नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून दागिने लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने उपनगर पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आफताब मन्नन शेख ऊर्फ विक्की शर्मा (४५, रा, वैष्णव संकल्प अपार्टमेंट, आडकेनगर, देवळाली कॅम्प) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब शेख ऊर्फ शर्मा याने पीडितेशी ओळख निर्माण केली. मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचे आमिष दाखवत त्याने महिलेशी जवळीक वाढवली. तिच्यासह घरच्यांचा विश्वास संपादन केला. तिला घरी बोलावून गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्याने शूटिंगही केले. ही क्लिप सोशल मीडियासह नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची आणि कुटुंबियांना मारुन टाकण्याची धमकी दिली. १ ऑगस्ट २०१२ ते २९ फेब्रुवारी २०२० या कालावधीत तिच्याकडून त्याने दागिने व काही कागदपत्रे जबरदस्तीने हिसकावून घेतले. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तेली करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -