घरक्राइमसेल्फीची भिती दाखवत अल्यवयीन मुलीवर वारंवार बलात्कार

सेल्फीची भिती दाखवत अल्यवयीन मुलीवर वारंवार बलात्कार

Subscribe

मोबाईलमध्ये काढलेला सेल्फी आई-वडिलांना दाखवण्याची भिती दाखवत एकाने अल्यवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीने भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी काठेगल्लीतील संशयित रेवन यादव काश्मिरे (वय १७) यास अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रेवनने पीडितेचा पाठलाग करत ओळख निर्माण केली होती. त्याने रस्त्यात अडवत तिच्यासमवेत मोबाईलमध्ये सेल्फी काढला होता. घरात कोणी नसल्याची संधी साधत त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यास तिने नकार दिला असता त्याने सेल्फी तुझ्या आई-वडिलांना दाखवेल, अशी भिती दाखवली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. ३१ ऑगस्ट २०२० ते २३ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. शरीरसंबंधाबाबत आई-वडिलांना सांगितले तर त्यांना ठार मारेल, अशीही धमकी त्याने तिला दिली होती. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अनवणे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -