घरक्राइमलग्नाच्या अमिषाने युवतीवर सहा महिने बलात्कार

लग्नाच्या अमिषाने युवतीवर सहा महिने बलात्कार

Subscribe

लग्नाचे अमिष दाखवून एकाने युवतीवर सहा महिने वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित युवतीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत बाळू भालेराव (रा. अरिंगळेमळा, एकलहरेरोड, नाशिकरोड)याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित व पीडित युवती एकमेकांच्या ओळखीचे आहे. संशयिताने पीडित युवतीशी ओळख वाढवली. त्याने तिला लग्नाचे अमिष दाखवले. मे २०२० ते ३० नोव्हेंबर २०२० या कालावधीत त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित युवतीने लग्नबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यातून फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -