Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र देवळ्यात कांदा लिलाव बंद पाडत 'रास्तारोको'

देवळ्यात कांदा लिलाव बंद पाडत ‘रास्तारोको’

Subscribe

नाशिक : देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी (दि.२५) सकाळच्या सत्रात कांदा लिलाव सुरू झाल्यावर प्रतिक्विंटल 2,410 रुपयाच्या आतच कांदाखरेदी झाली. शासनाने नाफेडमार्फत जाहीर करण्यात आलेला भाव मिळत असला तरीही नाफेडचे प्रतिनिधी लिलाव प्रक्रियेत सहभागी झाले नसल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांदा लिलाव बंद पाडून देवळा-कळवण रस्त्यावर आंदोलन केले.

बाजार समिती आवारासमोरील या आंदोलनाप्रसंगी संतप्त शेतकर्‍यांनी निर्यातशुल्क मागे घेतले जात नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार, असा आक्रमक पवित्रा घेतला. आंदोलनस्थळी वेळीच देवळा तहसीलदार विजय सूर्यवंशी, निवासी नायब तहसीलदार दिनेश शेलूकर यांनी भेट देऊन कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेऊन भावना शासनाकडे पोहोचवू, अशी ग्वाही दिली.

- Advertisement -

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, मविप्रचे संचालक विजय पगार, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष माणिक निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, तालुका अध्यक्ष संजय देवरे, बंडू आहेर, महेंद्र आहेर, सचिन सूर्यवंशी, भाऊसाहेब मोरे, बापू देवरे, शशिकांत पवार, बाळासाहेब मगर, संतोष शिंदे, सचिव माणिक निकम आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाफेडचे खरेदी केंद्र वाढवा; भुजबळांची केंद्राकडे मागणी 

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रिय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी दूरध्वनीद्वारे केलेल्या चर्चेदरम्यान केली. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, विंचूर, अंदरसूल, मुंगसे, ताराबाद, नामपूर, मालेगाव, मनमाड, देवळा येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, शनिवारी (दि.२६) येवल्यात नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यात आता एकूण १६ ठिकाणी नाफेडच्या वतीने कांदा खरेदी केंद्र सुरू राहणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -