घरमहाराष्ट्रनाशिकरेशन दुकानदार लढवणार विधानसभेच्या २८८ जागा

रेशन दुकानदार लढवणार विधानसभेच्या २८८ जागा

Subscribe

मागण्या मान्य न केल्यास २८८ जागा लढवणार;रेशन दुकानदार संघटनेचा इशारा

विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार्‍या राज्यातील रेशन दुकानदारांच्या संघटनेने आता सरकारविरोधात आंदालन तीव्र करताना मागण्या मान्य न केल्यास धान्याची उचल बंद करण्याबरोबरच विधानसभेच्या २८८ जागांवर उमेदवार देण्याचा इशारा दिला आहे.

स्वस्त धान्य दुकानदार आणि रॉकेल विक्रेत्यांच्या अडचणींबाबत परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे राज्यस्तरीय मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर होते. यावेळी बाबर म्हणाले, शासनाने सतत दुकानदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाने केरासीन बंद करून परवानाधारकांना वार्‍यावर सोडले आहे. आता स्वस्त धान्य दुकानदारांबाबत तेच होत आहे. त्यामुळे बंद केलेले केरासिन पूर्ववत सुरू करावे, रेशन दुकानदारांना तामीळनाडूच्या धर्तीवर मानधन देणत यावे, अशा प्रमुख मागण्या मान्य न केल्यास स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी धान्य उचल बंद करण्याबरोबरच मोर्चा काढणे, धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यानंतरही शासनाने रेशन दुकानदारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकींत २८८ जागांवर भाजपविरोधात उमेदवार देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

- Advertisement -

यावेळी राज्याचे सचिव बाबूराव म्हमाणे, विजय गुप्ता, नाशिक जिल्ह्यातील गणपत डोळस पाटील, निवृत्ती कापसे, रामदास चव्हाण, दिलीप नवले, ढवळू फसाळे, माधव गायधनी, अशोक बोराडे, वंदन बागूल, चेतन घोलप, लालू आचारी आदींसह राज्यातील सर्व रेशन दुकानदार उपस्थित होते.

या आहेत प्रमुख मागण्या

  • केरोसिन परवानाधारकांना पेंन्शन योजना लागू करावी.
  • केरोसिन परवानाधारकांना गॅस एजन्सी द्यावी.
  • दुकान भाडे, मदतनीस, वीजबील मिळावे.
  • पॉस मशिनमध्ये येणारे तांत्रिक दोष दूर करावेत.
  • दुकानदारांच्या संरक्षणासाठी कायदा करावा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -