Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक रवी पुजारीची जेलमध्ये रवानगी

रवी पुजारीची जेलमध्ये रवानगी

आवाजाचे नमुने तज्ञांकडे रवाना

Related Story

- Advertisement -

नाशिक : पाथर्डी फाटा येथे बांधकाम व्यवसाय कार्यालयावर गोळीबार करून 10 कोटींची खंडणी प्रकरणी कुख्यात गुंड रवी पुजारी याची सहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्याला आज पुन्हा न्याल्यात हजर करण्यात आले. त्यास आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्याची पुन्हा अर्थररोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान मुंबई गुन्हेशाखेच्या या प्रकरणातील तपास पूर्ण झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पुजारी चे या प्रकरणातील फोन कॉल तपासणीसाठी त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले असून ते तज्ञांकडे रवाना करण्यात आले आहेत. त्याची कोरोना चाचणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून या नंतर मुबईच्या आर्थर रोड कारागृहत रवानगी करण्यात येणार आहे.

- Advertisement -