वहिनीच्या अंत्यविधीत दिराने सोडला प्राण

Pothole Death bike accidents in thane due to potholes 23 year boy dead

नाशिकरोड येथील मोटवानी रोडवर राहणार्‍या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा देवळाली गावातील स्मशानभूमीकडे जात असताना दिराला हार्टअ‍ॅटक आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे माखिजा कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोटवानी रोड परिसरातील सुनिता रामचंदमाखिजा (६२) यांच्या मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.३१) दुपारी 12 वाजेच्या सुमारास देवळालीगाव येथे अंत्यविधीसाठी जात असताना बिटको चौकात अंत्ययात्रा आल्यानंतर त्यांचे दिर परसराम माखिजा (६५) यांच्या छातीत कळ आली. असह्य वेदना झाल्याने थेट जयराम रुग्णालयाकडे उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या वहिनी मृत सुनिता यांचा देवळाली गावातील स्मशानघाटावर अंत्यविधी सुरु असतानाच डॉक्टरांनी परसराम यांना मृत घोषित केले. अंत्यविधीतच कुटुंबातील दुसर्‍या व्यक्तीच्या मृत्यू झाल्याने माखिजा कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सुनिता यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. तर परसराम यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.