घरमहाराष्ट्रनाशिकव्यापारी, व्यावसायिकांना दिलासा, मात्र वेळेचे बंधन राहणार

व्यापारी, व्यावसायिकांना दिलासा, मात्र वेळेचे बंधन राहणार

Subscribe

विकेंड लॉकडाऊन सुरुच; शनिवार, रविवारी विवाह सोहळे, सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी

जिल्ह्याचा समावेश तिसर्‍या टप्प्यात झाल्याने आता निर्बंध अधिक शिथील झाले आहेत. सोमवार (दि.7)पासून सर्व व्यवहार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरळीतपणे चालू राहतील. अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने, हॉटेल्स, सलून, जिम तसेच सार्वजनिक ठिकाणे निर्बंधासह सुरु राहणार आहेत. तसेच जिल्हाअंतर्गत बससेवेला ‘डबल बेल’ मिळाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील निर्बंध शिथील करुन व्यापार व व्यावसायिकांना दिलासा देण्याची भूमिका पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतली. त्यानुसार सर्व प्रकारची दुकाने आता सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद राहतील. उपहारगृहे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी त्यांना निर्धारित वेळेतच 50 टक्के क्षमतेने सुरु करता येणार आहेत. त्यानंतर फक्त पार्सल सेवा देता देणार आहे. सार्वजनिक ठिकाणे, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग करणार्‍यांना सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत मुभा देण्यात आलेली आहे. खासगी कार्यालये दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आलेली आहे. 50 जणांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ होणार आहेत. तर अत्यंसंस्कारासाठी 20 लोकांना परवानगी असेल. बांधकामाच्या ठिकाणी कामासाठी परवानगी असून त्यांना केवळ 4 वाजेपर्यंत काम करता येणार आहे. विकेंड लॉकडाऊन सुरुच राहणार असल्याने शनिवार व रविवारी विवाह सोहळे, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असेल, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जाहीर केले आहे.

- Advertisement -

शनिवार, रविवार बंदच!

निर्बंध शिथील करत असताना प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी, रविवारी सर्व दुकाने व आस्थापना पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे तिसर्‍या टप्प्यात काही शिथीलता असली तरी विकेंड लॉकडाऊन लागू राहणारच आहे. यात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.

कोरोना संसर्ग पुन्हा बळावण्याची शक्यता आजही नाकारता येत नाही. दुसर्‍या लाटेत मृत्यूदर मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे विकेंड लॉकडाऊन सुरुच असेल. या कालावधित विवाह सोहळे, सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी आहे. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -