घरमहाराष्ट्रनाशिकबाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा, शाखाध्यक्षांना कानमंत्र

बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा, शाखाध्यक्षांना कानमंत्र

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शाखाध्यक्षांच्या मेळाव्यात केलं मार्गदर्शन

पक्षात नवे-जुने असा वाद न ठेवता पक्षाच्या कामासाठी एकदिलाने काम करा. लोकसंपर्क हीच आपली संपत्ती आहे. शिवसेनाप्रमुखांसोबत काम करताना त्यांनी मला हीच शिकवण दिली. लोकांना नावाने ओळखता यायला हवे, तरच लोक तुम्हाला ओळखतील असे सांगत आजपासून पक्षाच्या कार्याला सुरुवात करा, पुढील आठवड्यात पुन्हा नाशिकला येऊन तुम्हाला तुमच्या जबाबदार्‍या दिल्या जातील. पक्षाची शिस्त पाळाचीच लागेल, ज्यांना बैठकीला बोलावलं जाईल त्यांनीच यायचं अशा सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये येत शाखाध्यक्षांसह पक्षसंघटनेत बदल केले. यावेळी शाखाध्यक्षांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवारांचा दाखला देत बोलतांना राज म्हणाले, महाराष्ट्रात पैसे न देता जर कुणाच्या भाषणाला गर्दी होत असेल ते राज ठाकरेंचे भाषण. हे माझे नव्हे तुमचे कौतुक आहे. नाशिक महापालिकेच्या सत्ताकाळात एकही भ्रष्टाचाराचा डाग न लागता विकासकामे आपण करून दाखवली, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

पुढील आठवडयात सोपवणार जबाबदारी

राज ठाकरे यांनी शाखाध्यक्ष म्हणून नियुक्त केलेल्या पदाधिकार्‍यांना उददेशून विचारले, शाखा अध्यक्ष म्हणून नेमणूक मान्य आहे का परत कुठे येऊन पडलो म्हणू नका तुम्हाला काय जबाबदारी येणार आहे याची कल्पना नाही अजूनही वेळ गेलेली नाही. पुढील आठवडयात पुन्हा नाशिकला येऊन प्रत्येकाची जबाबदारी काय असेल याचा आराखडा दिला जाईल त्याप्रमाणे काम करावे लागले अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -