घरक्राइम'या' नंबरवर करा 'अवैध' धंद्याची बिंदास तक्रार; ग्रामीण पोलिसांची हेल्पलाईन सुरू

‘या’ नंबरवर करा ‘अवैध’ धंद्याची बिंदास तक्रार; ग्रामीण पोलिसांची हेल्पलाईन सुरू

Subscribe

नाशिक : जिल्ह्यात मागील काळात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. त्यातच अवैध व्यवसायही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले होते. त्या अवैध व्यवसायांना स्थानिक पातळीवर प्रशासनाकडूनच पाठबळ मिळत असल्याचेही आरोप करण्यात येत होते. याच पार्श्वभूमीवर नवनियुक्त नाशिक ग्रामीण पोलीस निरीक्षक शहाजी उमाप यांनी रुजू होताच अवैध व्यवसायांची पाळेमुळे उध्वस्त करण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने आता त्यांनी पाऊल टाकायला सुरवात केली आहे. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचा निपटारा करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने आता हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्यात सुरू असलेले अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याची माेहीम पाेलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी हाती घेतली असून त्यासाठी ६२६२२५६३६३ या नंबरची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. नाशिक शहर पाेलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील वगळता जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही हेल्पलाइन सुरू राहणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अवैध व्यवसायाची माहिती, तक्रार थेट हेल्पलाइन नंबरवर संपर्क करून करावी असे आवाहन उमाप यांनी केले आहे. तक्रारदाराचे नाव गोपनिय ठेवले जाईल आणि तक्रारीची दखल घेत तत्काळ कारवाई केली जाईल असेही पाेलीस अधीक्षक शहजी उमाप यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -