घर महाराष्ट्र नाशिक साधुग्रामसाठी जागा आरक्षित करा; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू-महंतांची मागणी

साधुग्रामसाठी जागा आरक्षित करा; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू-महंतांची मागणी

Subscribe

नाशिक : येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळयासाठी प्रशासनाने नियोजन सुरू करावे, साधू-महंतांच्या आखाड्यांसाठी मुबलक जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने जागा अधिग्रहीत करण्यात यावी, तसेच मुलभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी नाशिकमधील प्रमुख आखाड्याच्या महंतांनी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने करावयाच्या सुविधांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

नाशिकला २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळा चार वर्षांचा कार्यकाळ असला तरी प्रशासकीय पातळीवर आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. साधू-महंतांनी गेल्यावेळी प्रमाणे येणार्‍या सिहंस्थ कुंभमेळाला मूलभूत सोयी-सुविधांसह साधुग्रामसाठी मुबलक जागा उपलब्ध करून देण्यात यावी व जागा अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया लवकर राबवावी अशी मागणी केली. साधू महंतांच्या ज्या काही सूचना असेल त्या सूचनांचे स्वागत केले जाईल.

- Advertisement -

कुंभमेळयात साधू-महंतांची तसेच, येणार्‍या संतांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने नियोजन करण्यात येईल असे आश्वासन आयुक्त करंजकर यांनी दिले. यावेळी दिगंबर आखाडयांचे महंत श्री भक्तिचरणदास महाराज, श्री महंत रामकिशोरदास शास्त्री महाराज,खाकी आखाडयांचे महंत श्री भगवानदास महाराज,महंत श्री राजारामदासजी महाराज,तसेच आखाडा साधू-महंतांचे समन्वयक तथा निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, स्वीयसचिव दिलीप काठे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -