घरमहाराष्ट्रनाशिकस्मशानभूमी, दफनभूमी जागेचा प्रश्न निकाली काढा अन्यथा जनआंदोलन; मनसेचा इशारा

स्मशानभूमी, दफनभूमी जागेचा प्रश्न निकाली काढा अन्यथा जनआंदोलन; मनसेचा इशारा

Subscribe

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागातील हिंदू, मुस्लीम, लिंगायत, गोसावी व ख्रिश्चन आदी विविध धर्मियांसाठी स्मशानभूमी व दफनभूमीची मोठया प्रमाणात आवश्यकता असल्याने पिंपळगाव बहुला येथील प्रस्तावित क्षेत्र गट क्र २४० आरक्षण क्रमांक २८० द्वारे ८ एकर जागेचे सदर स्मशानभूमी व दफनभूमीसाठी आरक्षित करण्यात आलेले आहे.मात्र अद्यापपर्यंत सदर जागेचे भूसंपादन करण्यात आलेले नाही. सातत्याने सर्व धर्मियांमध्ये वाढत असलेल्या अंत्यसंस्कारांमुळे सदर स्मशानभूमी व दफनभूमीची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर जागेचे भूसंपादन करण्यात यावे अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे माजी नगरसेवक सलिम शेख यांनी दिला आहे.

मनसेच्यावतीने उपायुक्त मनोज घोडे पाटील यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी सलीम शेख म्हणाले की, नाशिक महानगरपालिकेने गेल्या पंचवार्षिकमध्ये अनेक गरज नसलेल्या जागांचे भूसंपादन केले मात्र या अत्यावश्यक कारणासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन होवू शकले नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्या अनुषंगाने या जागेचे तांतडीने भूसंपादन करुन सदर दफनभूमी व स्मशानभूमी सर्व धर्मियांसाठी तातडीने सुरू करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास सर्व धर्मियांच्या वतीने जन आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी मनसे कामगार सेनेचे सोपान शहाने, शहर उपाध्यक्ष विजय अहिरे, विभाग अध्यक्ष योगेश लभडे, उपविभाग अध्यक्ष वैभव महीरे, प्रविण अहिरे,शहर सरचिटणीस ज्ञानेश्वर बगडे, विशाल भावले, राहुल जाधव उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -