घरताज्या घडामोडीग्रामीण भागात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बनसोड यांच्यावर जबाबदारी

ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बनसोड यांच्यावर जबाबदारी

Subscribe

उपाययोजनेसाठी त्रिस्तरीय संरक्षण रचना ः जबाबदार्‍यांचे विभाजन

नाशिक

मालेगाव शहरात करोनाचा प्रार्दुभाव वाढत असून याचा ससंर्ग जिल्हयातील ग्रामीण भागात पसरू नये याकरीता करावयाच्या उपाययोजनांची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यावर सोपविण्यात आली आहे. प्रशासनाने करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केलेल्या त्रिस्तरीय संरक्षण रचनेतील ग्रामीण भागासाठी बनसोड यांची घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

मालेगाव शहरात करोना बाधित रूग्णांची संख्या ८५ झाली आहे तर जिल्हयात ९९ करोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात सिन्नर, बागलाण, चांदवड या तालुक्यांचाही सामावेश आहे. शहरात करोना बाधित रूग्ण बरे होत असले तरी मालेगावमध्ये मात्र करोना बाधितांचा मृत्यु ही प्रशासनासमोरील चिंतेची बाब आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून मालेगाव शहरात करोनाचा अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. याकरीता कळवणचे उपविभागीय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची घटना व्यवस्थापक तथा ‘इर्मजन्सी ऑपरेशन सेंटर’चे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अपर जिल्हाधिकारीपदी धनंजय निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रिक्त असलेल्या मालेगाव उपायुक्तपदाचा पदभारही ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. जिल्हयात करोनाचा पहीला रूग्ण लासलगावमध्ये आढळून आला. त्यानंतर मालेगाव वगळता सिन्नर, चांदवड तालुक्यातही करोना बाधित रूग्ण आढळून आला आहे. जिल्हयातील पंधरा पैकी ११ तालुक्यांमध्ये करोनाचा प्रभाव नसला तरी, या भागात करोनाचा संसर्ग होउ नये याकरीता प्रशासनाने पावलं उचलली आहे. याकरीता त्रिस्तरीय संरक्षक रचना लागू करण्यात आली आहे. नगरपालिका क्षेत्र, महापालिका क्षेत्र व जिल्हयातील ग्रामीण भाग अशी रचना करण्यात आली आहे. त्यानूसार ग्रामीण भागाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

उपलब्ध सुविधांचा घेणार आढावा

ग्रामीण भागात करोनाचा शिरकाव झाला नसला तरी, याचे लोण या भागात पसरू नये याकरीता उपायोजना आखण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील मनुष्यबळ उपलब्धता, साधनसामग्रीचा प्रभावी विनियोग करणे, औषधांची पुर्तता, तसेच संकट टाळण्यासाठी पुर्वतयारी उपलब्ध सुविधांचे नियोजन या माध्यमातून करण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर बनसोड यांनी ग्रामीण भागात भेटी देत आढावा घेण्यास सुरूवात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -