घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यातील १४८ उमेदवारांचा आज फैसला, येथे होणार मतमोजणी

जिल्ह्यातील १४८ उमेदवारांचा आज फैसला, येथे होणार मतमोजणी

Subscribe

विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार याचा फैसला गुरूवारी (दि. २४) होणार आहे.

विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार याचा फैसला गुरूवारी (दि. २४) होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघांतील १४८ उमेदवारांचा फैसला मतमोजणीने फैसला होणार आहे. मतमोजणीसाठी १ हजार २०  कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यात १५ मतदार संघांत ६२ टक्के मतदान झाले. ४५ लाख ४४ हजार ६४१ मतदारांपैकी २८ लाख १७ हजार ९९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत दोन टक्क्यांनी मतदानात घट झाली तर, २०१९ च्या  लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यात तीन टक्क्यांनी वाढ झालेली आहे. या मतदानाचा कोणत्या उमेदवारांना कसा विजयी लाभ होतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती. उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळाल्याने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांची चांगलीच दमछाक झाली. त्यातही मतदानाचा टक्का घटल्याने उमेदवारांची धाकधूक वाढलेली होती.

- Advertisement -

गुरूवारी दुपारी ३ वाजेपर्यंत जनमताचा कौल मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. याकरीता प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही त्या-त्या तालुक्यातील मतमोजणी केंद्रांवर होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात १४ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच पोस्टल बॅलेटसाठी प्रत्येक मतदारसंघात दोन टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.  प्रत्येक टेबलावर मतमोजणी पर्यवेक्षक, सहायक पर्यवेक्षक व सुक्ष्म निरीक्षक असे तीन अधिकारी व एक शिपाई असतील. पंधरा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले कर्मचारी तसेच राखीव कर्मचारी असे सुमारे ९०० कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांचे बुधवारी रॅण्डमायजेशन करण्यात येवून त्यांना मतदारसंघ नियुक्तीचे ठिकाण कळविण्यात आले. गुरूवारी सकाळी ७ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. उमेदवारांसमक्ष स्ट्राँगरूम खोलून तेथील ईव्हीएम मतमोजणीच्या टेबलावर आणण्यात येतील. सर्वप्रथम पोस्टल मतमपत्रिकांची मतमोजणी केली जाईल. त्यानंतर मतदान यंत्रांच्या मतमोजणीला सुरूवात होईल. पोस्टल मतमोजणीसाठी सुमारे ४० मिनिटांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्येक फेरीसाठी अर्धा तास लागू शकतो. प्रत्येक फेरीनंतर निकाल घोषित केला जाईल. साधारणपणे दुपारी १२ वाजेपर्यंत मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होईल असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व तालुक्यांना भेटी देत मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूमची पाहणी करून आढावा घेतला. 

व्हीव्हीपॅटचीही पडताळणी

लोकसभेप्रमाणेच प्रत्येक मतदारसंघातील पाच मतदान केंद्रावरील  व्हीव्हीपॅट मशिनची मतमोजणी होईल. या प्रक्रियेला सुमारे एक ते दिड तासाचा अवधी लागेल. लोकसभा निवडणुकीत एकतर्फी लढत झाल्याने या व्हीव्हीपॅट मतमोजणीबाबत उमेदवार फारसे उत्सुक नव्हते . मात्र विधानसभा निवडणुकीत अत्यंत काटयाची टक्कर असल्याने उमेदवारांकडून पडताळणीची मागणी होण्याची शक्यता आहे. 

- Advertisement -

असे आहे नियोजन …

मतमोजणी निरीक्षक – २१०
मतमोजणी सहायक – २१०
सूक्ष्म निरीक्षक ३३०
शिपाई २५५
पोस्टल बॅलेट मतमोजणी निरीक्षक ३०
ईटीपीबीएस मोजणी निरीक्षक १५

येथे होईल मतमोजणी

नांदगाव – शासकीय नवीन इमारत कार्यालय, नांदगाव तहसील कार्यालयालगत
मालेगाव मध्य – शिवाजी जिमखाना, श्रीरामनगर, संगमेश्वर
मालेगाव बाह्य – महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम
बागलाण – नवीन मध्यवर्ती प्रशासकिय इमातर, तहसिल कार्यालय
कळवण – पंचायत समिती सभागृह, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत
चांदवड – नवीन प्रशासकीय इमारत, मनमाडरोड
येवला – औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाभुळगाव
सिन्नर – तहसील कार्यालय
निफाड – कर्मवीर गणपतराव मोरे संस्थेचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
दिंडोरी – मविप्र संस्थेचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय उमराळे रोड
नाशिक पूर्व – विभागीय क्रीडा संकुल, नवीन आडगांव नाका
नाशिक मध्य – दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर
नाशिक पश्चिम – छत्रपती संभाजी स्टेडियम, अश्विननगर
देवळाली – महापालिका विभागीय कार्यालय, नाशिकरोड
इगतपुरी – शिवाजी स्टेडियम, कन्या शाळेजवळ, सीबीएस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -