घरताज्या घडामोडीनिवृत्त जवानाची सतर्कताः हल्लेखोर तरुणाच्या मुसक्या आवळल्या

निवृत्त जवानाची सतर्कताः हल्लेखोर तरुणाच्या मुसक्या आवळल्या

Subscribe

डीजीपी नगर-२ मधील माऊली लॉन्स परिसरातील घटना, पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात

डीजीपी नगर-२ मधील माऊली लॉन्स परिसरात धुमाकूळ घालतानाच मेडिकलची तोडफोड करत एका माथेफिरूने दहशत निर्माण केली होती. या ठिकाणाहून जात असलेल्या निवृत्त जवानाने अत्यंत चपळाईने या तरुणाला ताब्यात घेतलं. त्यानंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांसमोर या तरुणाला बेदम मारहाण केली.

बुधवारी (दि.११) रात्री ९ वाजेदरम्यान एक तरुण इंद्रायणी मेडिकल स्टोअर्समध्ये आला. त्याने दुकानात शिरून मी गॅंगचा माणूस आहे, मला २० लाख रुपये खंडणी दे नाहीतर तुला उचलून नेईल, अशी धमकी दिली. तसेच, दुकानाच्या काउंटरची काचही फोडली. या प्रकाराने घाबरलेल्या दुकानातील मुलाने तत्काळ एक शटर बंद केलं. हे पाहताच माथेफिरू तरुणाने दगड फेकल्याने दुकानातील बहुतांश काचा फुटल्या, तसेच औषधांच्या बाटल्यांचेही नुकसान झाले.

- Advertisement -

अटकाव करायला गेलेल्या तरुणावरही या माथेफिरुने कटरने हल्ला करत त्याला जखमी केले. त्यामुळे त्याला पकडायला कुणीही धजावत नव्हते. मात्र, त्याचवेळी सैन्यदलाच्या सेवानिवृत्त जवानाने मोठ्या हिंमतीने त्यास मागून पकडले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी माथेफिरू तरुणाला ताब्यात घेतले असता संतप्त जमावाने तरुणाला जबर मारहाण केली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -