घरमहाराष्ट्रनाशिकआम आदमी पक्षाकडून शिक्षणाधिकार्‍यांना तांदूळ भेट

आम आदमी पक्षाकडून शिक्षणाधिकार्‍यांना तांदूळ भेट

Subscribe

निकृष्ट पोषण आहाराच्या निषेधार्थ उपहासात्मक आंदोलन

नाशिक : शालेय पोषण आहारात दिलेल्या तांदळात मोठया प्रमाणावर किडे असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. पुरेशा मनुष्यबळाअभावी अपवाद वगळता उर्वरित संस्था किडे न काढताच तांदूळ शिजवत असल्याने त्याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शालेय पोषण आहाराचा दर्जा सुधारावा अशी मागणी करत आम आदमी पक्षाच्यावतीने महापालिका शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांची भेट घेत त्यांना तांदूळ भेट देण्यात आले.

किडे असलेल्या तांदळाचा पुरवठा करणारे अधिकारी, कर्मचारी किंवा तांदूळ साफ न करताच ते शिजवणारे ठेकेदार आपल्या पोटच्या मुलांसाठी किडे असलेल्या तांदळाची खिचडी शिजवतील का, असा संतप्त सवाल यानिमित्ताने केला जात आहे. केंद्र सरकारचे निर्देश आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार सेंट्रल किचन योजनेच्या माध्यमातून माध्यान्ह भोजन प्रक्रिया राज्यात सुरू करण्यात आली. महापालिका व खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सारख्या चवीचे, ताजे, पोषक व सकस आहार मिळावा, यासाठी सेंट्रल किचन पद्धतीने शालेय पोषण आहारांतर्गत माध्यान्ह भोजन पुरवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. नाशिक महापालिकेच्यावतीने ठेेकेदारांमार्फत पोषण आहार पुरवठा केला जात आहे.

- Advertisement -

अक्षरशः या तांदळात किडेही शिजवले जात असून यामुळे मुलांच्या जीविताशीच खेळ केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच यापूर्वीच्या घटनांमधील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी अलका सोनवणे, अ‍ॅड. नीलम बोबडे, अ‍ॅड. शिवाणी देसले ,कस्तूरी आटवणे, अनुजा नाईक, मंजिरी आटवणे, जितेंद्र भावे, राजेंद्र गायधनी, अमित यादव, विलास देसले, प्रतिक पवार, राजेंद्र हिंगमीरे, सुरज पुरोहित शांताराम सोनवणे आदि उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -