घरमहाराष्ट्रनाशिकराजकीय पक्षांचे नाशिकमधील धनाढ्य उमेदवार

राजकीय पक्षांचे नाशिकमधील धनाढ्य उमेदवार

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांकडील संपत्तीची माहितीदेखील पुढे आली आहे.

गोडसेंकडे ६ कोटी

हेमंत गोडसे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर साधारण ६ कोटी ३५ लाखांची संपत्ती आहे. अचल सपत्तीत रेणुका बिल्डकॉन, गुरू एंटरप्रायझेस, जय मातादी एंटरप्रायझेस, मातोश्री एंटरप्रायझेस, याप्रमाणे विविध संस्थांमध्ये त्यांचे समभाग आहेत. गोडसे यांना स्वमालकीची व वडिलोपार्जित शेतजमिनी आहेत. देवळाली कॅम्पला ऑफीस आहे, संसारी व लॅम रोडला घर सदनिका आहेत. ६ कोटी ३५ लाखाची पत्नीच्या नावे २१ लाख २ हजार, मुलाच्या नावावर १४ लाख ५२ हजाराची चल संपत्ती आहे. अचल संपत्तीत १ कोटी १९ हजार ९८ हजाराची, ९० लाख आणि ३६ लाख ५६ हजार याप्रमाणे स्वतःच्या नावावर २ कोटी ४६ लाख५६ हजारांची अचल संपत्ती आहे.

डॉ. पवारांकडे १३ कोटी

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार डॉ. भारती प्रवीण पवार यांची कौटुंबिक संपत्ती १३ कोटी रुपयांची आहे. कुटुंबात फक्त पती प्रवीण यांच्याच डोक्यावर कोचरगाव सोसायटीचे १० लाख ७६ हजार ९७५ रुपयांचे कर्ज आहे. डॉ. भारती पवार यांची स्वत: कडील जंगम मालमत्ता ५३ लाख ४२ हजार ७५४ असून ३० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पती प्रविण पवार यांची जंगम मालमत्ता ६ लाख ८० हजार ६२ रुपये आहे. मुलाच्या नावे १२ लाख ६८ हजार रुपयांची मालमत्ता आहे. तसेच पतीच्या नावे असलेल्या शेतजमिनींची आताच्या बाजार भावाप्रमाने १० कोटी ६० लाख ९६ हजार ५० रुपये किंमत आहे.

- Advertisement -

जे. पी. गावितांकडे २.१६ कोटी

अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कळवण-सुरगाणा विधानसभेचे आमदार जिवा पांडू गावित यांनी माकपतर्फे लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. २०१४ च्या निवडणुकीपर्यंत गावित यांच्याकडे एक कोटी १५ लाख रुपयांची मालमत्ता होती. २०१९ पर्यंत दुपटीने वाढ होऊन आता २ कोटी १६ लाख रुपये झाली. यात एक कोटी ४९ लाख ८, ८५६ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर ६७ लाख ८६ हजार ३५० रुपयांची स्थावर संपत्ती त्यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे आमदारांनी ६ लाख ८३ हजार ३६५ रुपयांचे कर्जही घेतले आहे. त्यांच्याकडे इनोव्हा कार व स्वराज ट्रॅक्टर असून एक लाख रुपये किमतीचे दागिने आहेत.

पवन पवार करोडपती

वंचित बहुजन आघाडीचे नाशिकचे उमेदवार पवन चंद्रकांत पवार यांच्याकडे ४ लाख ९ हजार ३६७ रुपये, तर पत्नीकडे ५३ हजार ८२० रुपयांची चल संपत्ती अशी ८६ लाख २८ हजार ६८२ रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांची एकूण मालमत्ता ९० लाख ९१ हजार ८६९ रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. व्यवसायाने शेतकरी असलेले पवार यांच्या नावे सुमारे १५ हून अधिक खटले न्यायप्रविष्ट आहेत. दोन गुन्ह्यांमध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ६ गुन्ह्यांमध्ये पोलीस तपास सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्वतःकडे ४६ हजार ८०० रुपयांचे सोने, तर पत्नीकडे ३३ हजार ८२० रुपयांचे सोने आहे. पवार यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -