घरक्राइमरिक्षाचालकाची गुंडगिरी, भरस्त्यात पोलिसाला शिवीगाळ, मारहाण

रिक्षाचालकाची गुंडगिरी, भरस्त्यात पोलिसाला शिवीगाळ, मारहाण

Subscribe

रिक्षात सुरू असलेल्या टेपचा आवाज कमी करण्यास सांगितल्याचा राग आल्याने रिक्षाचालकाने एका पोलीस शिपायास शिवीगाळ व मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (दि. २५) सकाळी साडेअकराच्या सुमारास द्वारका परिसरात घडलेल्या याप्रकरणी पोलीस शिपाई नंदू गवळी यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित रिंकेश गणेश सोलंकी (वय २२, रा. म्हसरुळ) यास अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस शिपाई गवळी हे शनिवारी द्वारका परिसरात वाहतूक नियमन करत असता संशयित रिंकेश रिक्षा (एमएच १५ एफयू २११९) घेवून आला. यावेळी रिक्षातील टेपचा आवाज मोठा असल्याने गवळी यांनी त्यास आवाज कमी करण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने सोलंकी याने गवळी यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच तसेच दगड फेकून मारत सरकारी कामात अडथळा आणला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ गेंगजे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -