घर महाराष्ट्र नाशिक रिक्षा-टॅक्सी, टेम्पो, ट्रकसेवा आज बंद, जिल्हाभरात प्रवाश्यांची तारांबळ

रिक्षा-टॅक्सी, टेम्पो, ट्रकसेवा आज बंद, जिल्हाभरात प्रवाश्यांची तारांबळ

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, तसेच ट्रकचालकांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.१२) श्रमिक चालक-मालक सेनेतर्फे प्रलंबित व इतर मागण्यांसाठी रिक्षा-टॅक्सी सेवा बंद ठेवली जाणार आहे. तसेच, सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती श्रमिक सेनेचे महानगरप्रमुख मामासाहेब राजवाडे यांनी दिली. (Rickshaw, Taxi, Tempo strike In Nashik district)

श्रमिक सेनेतर्फे रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक-मालक यांनी विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकार्‍यांना २१ जुलै रोजी लेखी निवेदन सादर केले होते. मात्र, त्याबाबत अद्यापही कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. परिणामी चालक अन् मालक नाहक भरडला जात आहेत. मात्र, त्यांच्याप्रति शासन उदासीन आहे.

- Advertisement -

परिणामी प्रलंबित व इतर विविध मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते ५ यावेळेत श्रमिक सेनेचे संस्थापक सुनील बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कार्याध्यक्ष भगवान पाठक, जिल्हाध्यक्ष अजय बागुल, बाबासाहेब राजवाडे, शंकर बागुल, नवाज सय्यद, राजेंद्र वाघले यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सर्व रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक-मालक आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामुळे चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत.

सिटीलिंक अन् एसटीत महिलांना ५० टक्के सूट याबाबत रोष  

सीटीलिंक बससेवा आजपर्यंतच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणा-या रिक्षा-टैक्सी चालकांचा रोजगार हिरावणारी आहे. सुमारे 23000 रिक्षा-टॅक्सी चालकांचे आयुष्य उदध्वस्त करणारी आहे. म्हणुनच या सिटीलिक बससेवेच्या विरोधात हे आंदोलन आहे. सिटीलिंक चालविण्यासाठी खर्च करण्यात येणारा पैसा हा नाशिकमधील रहिवाशांच्या करातून करण्यात येतो, परंतु त्याचा फायदा महानगरपालिकबाहेरील गावांना होत आहे. हा प्रकार त्वरीत थांबायला हवा व जनतेचा पैसा शहर विकासासाठीच वापरला जावा. नाशिक शहरातून बेकायदा चालु असणारी ओला उबेर बंद करण्यात यावी. शासनाकडुन प्रवासी भाडयामध्ये एसटी महामंडळाच्या बसमध्ये बसल्यास महिलांना 50 टक्के, दिव्यांगांना 75 टक्के व वृध्दांना 100 टक्के सवलत दिली जाते, त्याच धर्तीवर रिक्षा-टॅक्सी चालकांना शासनाकडुन अनुदान देण्यात यावे, यासह अनेक मागण्या आंदोलनातून पुढे करण्यात आलेल्या आहेत.

रिक्षा टॅक्सीचालक-मालकांच्या विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकार्‍यांना लेखी निवेदन दिले होते. परंतु, शासनाने त्याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. अखेर मंगळवारी सायंकाळपर्यंत रिक्षा, टॅक्सी, टेम्पो सेवा बंद ठेऊन आंदोलन केले जाणार आहे. : बाबासाहेब राजवाडे, महानगरप्रमुख, श्रमिक सेना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -