घरमहाराष्ट्रनाशिक'वॉव'तर्फे महिलांची शुक्रवारी 'राइड विथ प्राईड' बाईक रॅली

‘वॉव’तर्फे महिलांची शुक्रवारी ‘राइड विथ प्राईड’ बाईक रॅली

Subscribe

महिलांच्या सबलीकरणाच्या वाटा दिवसेंदिवस विस्तृत होत आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या चोखपणे बजावताना करिअरचे शिखर गाठण्यासाठीची धडपड उल्लेखनीय असते. महिलांच्या या गौरवास्पद कामगिरीचा सन्मान करण्यासाठी महिला दिनी ८ मार्चला शहरातील वॉव (वूमन ऑफ विस्डम) या महिलांच्या समूहाद्वारे दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

महिलांच्या सबलीकरणाच्या वाटा दिवसेंदिवस विस्तृत होत आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या चोखपणे बजावताना करिअरचे शिखर गाठण्यासाठीची धडपड उल्लेखनीय असते. महिलांच्या या गौरवास्पद कामगिरीचा सन्मान करण्यासाठी महिला दिनी ८ मार्चला शहरातील वॉव (वूमन ऑफ विस्डम) या महिलांच्या समूहाद्वारे दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. राइड विथ प्राईड – अभिमानाने चला, ही या रॅलीची संकल्पना असून, मार्ग महिलांसाठीदेखील असतो यावर आधारीत आहे.

शहरातील १००० हून अधिक बाइकर्णी (महिला दुचाकीस्वार ) यात आपला सहभाग नोंदविणार आहेत. आकर्षक पारंपरिक वेषभूषा – भरजरी पैठणी, नऊवारी, सलवार-कुडता ते नवयुगातील टी-शर्ट, जॅकेट आणि जीन्सचा पेहराव करून सोबत सामाजिक संदेश घेऊन बाइक रॅलीत मोठ्या उत्साहात महिला सहभागी होतील. रॅलीसाठी वयोमर्यादा कमीत कमी १८ वर्षे असून वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे पण मागे बसलेल्या दुचाकीस्वारासाठी कुठलीही वय मर्यादा नाही त्यामुळे मुलींपासून ते अगदी ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वचजणी या रॅलीत सहभागी होतात. गाडीची उत्तम सजावट करणाऱ्या बाइकर्णी, सामाजिक संदेशासाठी काही वेगळेपण जपणाऱ्या बाइकर्णीना विशेष पुरस्कारांद्वारे गौरविण्यात येते. तसेच, प्रत्यक्ष सहभागी महिलेस आकर्षक गिफ्ट हॅम्पर आणि प्रमाणपत्र देण्यात येते. या रॅली साठी कुठलीही फी नसून सहभागी महिलेकडे लायसेन्स असणे आणि हेल्मेट परिधान करणे अनिवार्य आहे. शहरातील एकमात्र रॅली आहे जिने १०० टक्के हेल्मेट धारक रॅलीचे उद्दिष्टे गाठल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. रॅली चा मार्ग हा ८.५ किलोमीटरचा असून ठक्कर डोम (येथून सुरुवात) – एबीबी सर्कल , महात्मा नगर, जेहान सर्कल , जुना गंगापूर नाका सिग्नल , कॅनडा कॉर्नर (अहिरराव फोटो स्टुडिओ) मार्गे कॉलेज रोड, मॉडेल कॉलनी, समर्थ नगर, महात्मा नगर, एबीबी सर्कल, ठक्कर डोम (रॅली समाप्ती ), असा मार्ग आहे.

- Advertisement -

यंदाच्या महिलादिनाची संकल्पना “बॅलन्स फॉर बेटर” वर आधारित असून लैंगिक समानते द्वारे सामाजिक प्रगती साधण्यावर भर देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने रॅलीत जनजागृती करण्यात येणार आहे. वॉव – वूमन ऑफ विस्डम या समूहा द्वारे रॅली च्या माध्यमातून सामाजिक प्रकल्पाना प्रसिद्धी देण्यात येते “वॉव लाल बिंदू बॅग अभियानाचे ” माहितीपर स्टॉल मांडण्यात येणार आहे जेणे करून वापरलेली पॅड्स रेड डॉट बॅग मध्ये टाकूनच घंटा गाडीत कचरा टाकावा जेणे करून कचऱ्याचे वर्गीकरण करणे सोपे होईल आणि प्रदूषण देखील टाळता येईल, या बाबत माहिती देण्यात येणार. वॉव समूहाच्या सदस्य महिला विधवा शेतकरी भगिनींसाठी आर्थिक मदतीसाठी आवाहन करणार आहे. जमा झालेल्या निधीतून मदत देण्यात येणार आहे. ह्या उपक्रमासाठी कम्युनिटी हेल्थ फाऊंडेशन चे सहकार्य लाभत असून शहरातील विविध महिलामंडळाने आपला सहभाग निश्चित केला आहे. शहरातील महिलांने मोठया संख्येने ह्या रॅलीत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

विद्या मुळाणे -९६७३७२४५८५, रेखा देवरे – ९३७३९०९५९६, अर्चना बोथरा- ७७५५९१६३५५, करूणा बागडे – ८७९३२१७४६३, रेखा म्हस्के – ९५२७४७७९२१, मिनाक्षी आहेर- ९३७३४०१४१४.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -