घरमहाराष्ट्रनाशिकपूरपाण्यासोबत तरुणाईचा आत्मघातकी खेळ

पूरपाण्यासोबत तरुणाईचा आत्मघातकी खेळ

Subscribe

जीव धोक्यात घालून सेल्फी, स्टंटबाजी; प्रशासनाचे दुर्लक्ष, सुरक्षारक्षक तातडीने तैनात करण्याची गरज

नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथे मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोदावरीला पुरस्थिती निर्माण होत असून नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी पाहण्यासाठी आलेले पर्यटक स्टंटबाजी करत आहे. गेट परिसरात वॉल कंपाऊंड आहेत. मात्र, सुरक्षारक्षक नसल्याने तसेच याकडे प्रशासन व पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. गोदावरी व दारणा नदीचे पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात आल्याने या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. धरणाच्या स्थळावर ओव्हेरफ्लो पाणी पाहण्यासाठी दरवेळी गर्दी होते. सेल्फी प्रेमात पडलेली तरुणाई पुराच्या पाण्यासोबत सेल्फी काढण्याचा आत्मघातकी खेळ करीत आहेत. या ठिकाणी येणारे पर्यटक स्टंटबाजी करत, जीव धोक्यात घालून धरणाचे गेटवर तसेच पुलावर उभे राहून सेल्फी काढत असल्याचे दिसत आहे. पाण्याचा प्रवाह वाढला आणि दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. यामुळे परिसरात स्टंटबाजी करणार्‍यांसह आणि सेल्फीप्रेमींवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. याबाबत कालवा निरीक्षकांनी पोलिसांना लेखी कळवले असल्याचे सांगितले. असे असले तरी पोलिसांचा कुठलाही बंदोबस्त दिसून येत नाही. याठिकाणी सुरक्षारक्षक तसेच पोलीस नसल्याने येथे येणारे काही पर्यटक हे दारूच्या नशेत बेधुंद होऊन धरणाचे किनार्‍यावर तसेच पुलावर उभे राहून जीवघेणी स्टंटबाजी करत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -