घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनांदुरीत ग्रामस्थांचा रास्तारोको; सप्तशृंगी गडावर जाणारी वाहतूक खोळंबली

नांदुरीत ग्रामस्थांचा रास्तारोको; सप्तशृंगी गडावर जाणारी वाहतूक खोळंबली

Subscribe

नाशिक : साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी वसलेले व कळवण तालुक्यांतर्गत असलेल्या नांदुरी गावात गुरुवारी (दि. २३) दुपारी एका महिलेला वाहनाने उडवले असता तात्काळ महिलेला गावकर्‍यांनी व ग्रामपंचायत सदस्य किरण अहिरे व सामाजिक कार्यकर्ते भाऊ कानडे यांच्यासह समस्त गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरी येथे घेऊन जात त्या महिलेवर तात्काळ उपचार करण्यात आले.

गुरुवारी दुपारी नांदुरी येथे अपघात झाल्याने सदर ठिकाणी गतिरोधक असणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता नांदुरी ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केले असून सदरच्या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने व अधिकार्‍यांकडून कुठल्याही प्रकारचे गांभीर्य न घेता वेळोवेळी दुर्लक्ष केले गेले. मात्र हा अपघात झाल्यानंतर गावकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले व रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागास जाग आल्याचे निदर्शनास आले व तसेच अधिकार्‍यांनी तात्केळ सदर पाहणी करून लवकरात लवकर गतिरोधक बसविण्यात यावे असे आदेश देण्यात आले.

- Advertisement -

अपघातानंतर बांधकाम विभागाला जाग : गतिरोधक बसवण्याचे दिले आदेश

दरम्यान, आक्रमक होत गावकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे. गावकऱ्यांच्या मागणीनुसार अपघात प्रवण ठिकाणी गतिरोधक बसवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. प्रशासनाच्या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले असले तरी, जर वेळेत कारवाई होऊन गतिरोधक नाही बसले तर पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपासवे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -