Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona : काय सांगताय? बाजारपेठेत जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे!

Corona : काय सांगताय? बाजारपेठेत जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे!

नाशिकमधील बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर आता राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. काही शहरात फारच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाशिकमधील बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहे.

किती मोजावे लागणार पैसे

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरामध्ये कडक लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. त्या निर्बंधानुसार आता नाशिकरकरांना बाजारपेठेत जाण्यापूर्वी पैसे मोजावे लागणार आहे. प्रति तास पाच रुपये प्रतिव्यक्ती आकारले जाणार आहे. त्यामुळे नाशिकमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी नाशिक शहरात थेट रस्त्यावर उतरुन गर्दीच्या ठिकाणी भेट दिली. त्याचप्रमाणे नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन देखील केले. त्याचप्रमाणे नियमांचे पालन न केल्यास शहरात लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाशिकरांना ८ दिवसांची मुदत दिली असून २ एप्रिल रोजी बैठक घेऊन लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाणार, असेही नमूद करण्यात आले आहे.

काय आहे नियमावाली?

- Advertisement -