घरमहाराष्ट्रनाशिकप्रचारासाठी १५ वाहनांना आरटीओची परवानगी

प्रचारासाठी १५ वाहनांना आरटीओची परवानगी

Subscribe

गाड्यांवर विनापरवानगी पक्षांचे स्टिकर दिसल्यास कारवाई

कुठल्याही पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार करताना वाहनांवर जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत कार्यालयाकडे उमेदवारांच्या प्रचारासाठी १५ वाहनमालकांचे अर्ज आले आहेत, त्यानुसार १५ वाहनांना एलईडी, पोस्टर, बॅनर, स्पिकर, लाऊड स्पिकरसाठी परवानगी दिलेली आहे. विनापरवानगी जाहिरातीद्वारे प्रचार करणार्‍या वाहनांवर कारवाई होणार असून यासाठी आरटीओने पथके तैनात केली आहेत.

लोकसभा निवडणूक मतदानासाठी अवघे १७ दिवस बाकी असल्याने उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. प्रचारासाठी अनेक उमेदवार नवनवीन कल्पनांनी वाहनांच्या माध्यमातून मतदारांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करत आहेत. प्रचारासाठी अनेक उमेदवार कार्यकर्त्यांच्या मदतीने वाहनांवर एलईडी, पोस्टर, बॅनर, स्पिकर, लाऊड स्पिकर, स्टिकर बसवित आहेत. त्याद्वारे मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, ‘आरटीओ’ची परवानगी न घेता परस्पर वाहनांच्या माध्यमातून उमेदवारांनी प्रचार केल्यास कारवाई होईल. विनापरवानगी चारचाकी वाहनांच्या काचेवर पक्षांचे स्टिकर लावल्यास वा अन्य बदल केल्यास संबंधित वाहनमालकांवर कारवाई होणार आहे.

- Advertisement -

विधानसभेचीही तयारी

नाशिक निवडणुकीत उमेदवारांच्या पैशांवर विधानसभेसाठी बाशिंग बांधलेल्यांनीही तयारी सुरू केल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसूत येत आहे. प्रचाराचे निमित्त करून हे इच्छुक तसेच विद्यमान आमदार आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्याचप्रमाणे विद्यमान आमदार कार्यकर्ते, मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांचा आपल्यावरील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी विद्यमान आमदारांसह इच्छुकांची संख्या मोठी आहे. यातील अनेक उमेदवार लोकसभेसाठी मते मागत असताना विधासभेतही आमच्याकडे लक्ष द्या, असे सांगत असल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -