घरताज्या घडामोडीलॉकडाऊनची अफवाच

लॉकडाऊनची अफवाच

Subscribe

सोशल मिडीयावरील मेसेजमुळे नागरीकांमध्ये संभ्रम

नाशिक : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शहरात कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून वेळेबाबतही निर्बंध लागू करण्यात आल्याचा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने व्यापार्‍यांसह नाशिककर संभ्रमात पडले आहे. हा संदेश पुर्णतः चुकीचा व फेक असून जिल्हयात कोणतेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिकसह राज्यात सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉनच्या विषाणूचा संसर्ग वाढला असून पुन्हा एकदा कोरोना रूग्णसंख्येचा विस्फोट पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य शासनाने सर्व जिल्हयांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मुंबईमध्ये दररोज कोरोना रूग्णांची संख्या हजारोंच्या पटीत वाढत असल्याने राज्यात निर्बंधांबाबत नवी नियमावली लागू करण्याबाबत गेल्या तीन चार दिवसांपासून चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या चर्चा सध्या झडत आहे.

- Advertisement -

दररोजची वाढती रूग्णसंख्या बघता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार अशी चर्चा नागरीकांमध्ये सुरू आहे. परंतु राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापुर्वीच लॉकडाऊनबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ज्या दिवशी राज्यात ७०० मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासेल त्या दिवशी आपोआप लॉकडाऊन लागेल असे स्पष्टीकरण यापूर्वीच देण्यात आले आहे.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरूवारी कोरोना आढावा बैठक घेऊन नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नाशिकमध्ये कोणतेही नवचीन निर्बंध लागू करण्यात आले नसून दर आठवडयाला बैठक घेउन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल असही त्यांनी स्पष्ट केले. परंतु काही जणांकडून लॉकडाऊनबाबत चुकीचा मेसेज व्हायरल केला जात आहे. यात लॉकडाउनची नियमावलीच टाकण्यात आली आहे. नाशिकमध्ये ५ वाजेनंतर बाजारपेठा बंद असतील.

- Advertisement -

शनिवार, रविवार वीकेंड लॉकडाउन, मॉल्स, चित्रपटगृहे बंद अशा प्रकारचे मॅसेज व्हायरल होत असल्याने व्यापारयांसह नाशिककरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही नागरीकांनी वृत्तपत्रांच्या कार्यालयात फोन करून लॉकडाऊनबाबतच्या मेसेजबाबत खातरजमाही केली. मात्र अशा कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले नसून हे मेसेज अफवा असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केेले आहे. सदरचे मेसेज हे मागील वर्षीच्या लॉकडाऊनचे असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केेले.

लॉकडाऊनबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सर्वांनी कोविड योग्य वर्तनाचे पालन करावे. ज्यांनी लस घेतली नाही किंवा ज्यांचा लसीचा दुसरा डोस घेणे बाकी आहे अशा नागरीकांनी लसीकरण करून घ्यावे. कोरोना त्रिसुत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. प्रशासनाला कोणतेही अप्रिय निर्णय घेण्यास भाग पाडू नये.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -