घरताज्या घडामोडीचक्क फ्रवशी अकॅडमी विकल्याचीही अफवा!

चक्क फ्रवशी अकॅडमी विकल्याचीही अफवा!

Subscribe

‘केकेआर’ने 227 करोड रुपयांना ही शिक्षण संस्था खरेदी केल्याचे मेसेज व्हायरल ; संस्थेच्या अध्यक्षांनी खोडला दावा

नाशिक : शहरातील नामांकित फ्रवशी इंटरनॅशनल अकॅडमी ही शैक्षणिक संस्था 227 करोड रुपयांना विकल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ‘केकेआर’संस्थेचे या संदर्भात बोलणे सुरु असल्याचे या मेसेजच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. मात्र, आर. एस. लथ एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष रतन लथ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा फेक मेसेज असल्याचे म्हटले आहे. अशा स्वरुपाचा कोणताही व्यवहार झालेला नसून पालकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गंगापूर रोडवरील फ्रवशी इंटरनॅशनल स्कूलही शहरातील नामांकित संस्था म्हणून ओळखली जाते. याच संस्थेची गंगापूर धरणाजवळ 40 एकर जागेत भव्य कॅम्पस आहे. ही शाळा विकणार असल्याच्या अनेक दिवसांपासून अफवा उठत आहेत. त्याच स्वरुपाचा मेसेज सोमवारी (दि.1) सकाळी व्हायरल झाला. या मेसेजमध्ये एका वृत्तवाहिनीचा दुजोरा देण्यात आला आहे. त्यामुळे पालकांनी विचारणा सुरु केली. ’केकेआर’या संस्थेनी तब्बल 227 कोटी रुपयांना फ्रवशी अकॅडमी विकत घेतल्याचे या मेसेजमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. विशेष म्हणजे संस्थेची संपूर्ण माहिती देण्यात आली असून ‘केकेआर’चे संचालक हे रतन लथ यांचे मित्रच असल्यामुळे हा व्यवहार झाल्याचे बोलले जाते.

फ्रवशी इंटरनॅशनल स्कूल ‘केकेआर’ला विकल्याची अफवा आहे. याविषयी पालकांकडून विचारणा होत आहे. परंतु, असा कोणताही व्यवहार झालेला नाही. काही दिवसांपूर्वी अविनाश भोसले, खासदार सुप्रिया सुळे यांनी ही संस्था खरेदी केल्याची चर्चा होती. त्याचपध्दतीने आता ‘केकेआर’ संस्थेविषयीचा हा मेसेज व्हायरल झाला आहे. येवढा मोठा निर्णय एका रात्रीतून घेतला जात नाही. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र यांना विश्वासात घेवूनच असा काही निर्णय घेतला जाईल. सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय असा कोणताही निर्णय होणार नाही. ‘केकेआर’ ही मित्राचीच संस्था असल्यामुळे त्याविषयी अशा अफवा उठत आहेत. पालकांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवू असे स्पष्ट मत ‘फ्रवशी’चे अध्यक्ष रतन लथ यांनी व्यक्त केले. मात्र,व्हायरल मेसेजविषयी तक्रार दाखल करण्यास त्यांनी नकार दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -