घरताज्या घडामोडीनाशिक पुणे रेल्वेलाईनच्या निधीसाठी पवारांकडे धाव

नाशिक पुणे रेल्वेलाईनच्या निधीसाठी पवारांकडे धाव

Subscribe

राज्य शासनाने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

नाशिक पुणे रेल्वेलाईन प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिल्यानंतर राज्य सरकारनेही मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी आज नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेत या प्रकल्पासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. रेल्वेलाईनचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मंत्रालयात लवकरच एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची ग्वाही देत निधीबाबतही प्राधान्याने विचार केला जाईल असे आश्वासन पवार यांनी दिले.

गेली अनेक वर्ष प्रतिक्षेत असलेल्या नाशिक पुणे रेल्वेलाईलच्या प्रस्तावाला नुकतीच केंद्र शासनाने तत्वतः मान्यता दिली. महारेलमार्फत या रेल्वेमार्गाची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी समारे १६ हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून यापैकी २० टक्के राज्य शासन, २० टक्के केंद्र शासन तर ६० टक्के निधी कर्जरोख्यातून उपलब्ध करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज खासदार हेमंत गोडसे यांनी पवार यांची भेट घेत चर्चा केली. मुुंबई पुणे नाशिक हा राज्यातील सुवर्ण त्रिकोण आहे. मुंबई पुणे हे शहर एकमेकांना जोडले गेल्याने या शहराचा मोठा विकास झाला आहे. नाशिक हे रेल्वेमार्गाने पुणे शहराला जोडण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू असून राज्य शासनाने या प्रस्तावास तातडीने मान्यता देऊन निधी मजूर करावा अशी मागणी यावेळी खासदार गोडसे यांनी पवारांकडे केली. नाशिक पुणे महामार्गाचे कामही पुर्णत्वास जात आहे. त्याचबरोबर हा प्रकल्पही पुर्णत्वास गेल्यास दळणवळणाच्या सुविधा निर्माण होऊन विकासाला चालना मिळेल असे खा. गोडसे यांनी सांगितले. याबाबत प्रस्तावित रेल्वेमार्ग ज्या लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघातून जात आहे अशा सर्वच आमदार, खासदारांची मंत्रालयात एक बैठक घेउन या प्रस्तावाबाबत प्राधान्याने विचार केला जाईल असे आश्वासन ना. पवार यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

विकासाला चालना
शहरात सातपूर, अंबड तसेच जिल्हयात मुसळगांव, माळेगाव तसेच गोंदे या ठिकाणी मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. परंतु नाशिक पुणे रेल्वेलाईन नसल्यामुळे उद्योग, व्यवसाय वाढीस मर्यादा आल्या आहेत. जिल्हयाच्या विकासाला चालना मिळण्यासाठी हा प्रकल्प मार्गी लावणे आवश्यक आहे. मध्य रेल्वे बोर्डाने नुकतीच याला मंजूरी दिली. केंद्रानेही याला मंजूरी दिली आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडूनही निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे यापार्श्वभुमीवर वित्तमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या प्रकल्पामुळे विकासाला चालना मिळेल.
खासदार हेमंत गोडसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -