घरताज्या घडामोडीग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर आवळल्या गुन्हेगारांच्या मुसक्या

ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर आवळल्या गुन्हेगारांच्या मुसक्या

Subscribe

ग्रामीण पोलिसांनी ६ गावठी कट्टे, ८ मॅगझीन, ३२ काडतुसे केली जप्त

जानेवारीमध्ये नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूका होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अवैध हत्यार बाळगणारे गुन्हेगारांची यादी तयार हत्यारे जप्त करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी पथके तयार केली आहेत.परराज्यातून जिल्ह्यात गावठी कट्टे व काडतुसांची विक्री होणार असल्याची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी सापळा रचत तब्बल ११ गुन्हेगारांना अटक केली. यामध्ये एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे. चार गुन्हेगारांकडून ६ गावठी कट्टे, ८ मॅगझीन, ३२ काडतुसे जप्त केले आहेत. गुन्हेगारांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गुन्हेगारांमध्ये सात मदतनीसांचा समावेश असून मध्यप्रदेशातील मुख्य सूत्रधार फरार झाला आहे.

लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गावठी कट्ट्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार वाघ यांनी मंगळवारी (दि.२२) एरिगेशन कॉलनी, लासलगाव येथे छापा टाकला. विपुल आहिरे याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी गावठी कट्टा व ५ जीवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्याकडून कट्टा व काडतुसे जप्त केली. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौकशीत त्याने उमर्टी, मध्यप्रदेशातील साथीदार शेख भाई याच्याकडून गावठी कट्टे आणून ते गुन्हेगारांना विक्री केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी ११ गुन्हेगारांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून कट्टे, काडतुसे जप्त केले आहेत.

- Advertisement -

अटक केलेले गुन्हेगार, जप्त शस्त्रे

लासलगाव येथील विपुल यमाजी आहिरे २ गावठी कट्टे, १२ काडतुसे, एक मोबाईल
विंचुर येथील संतोष ठाकरे २ गावठी कट्टे, १४ काडतुसे, एक मोबाईल
पिंपळद (ता.चांदवड) येथील केशव माधव ठोंबरे १ गावठी कट्टा, ४ काडतुसे, एक मोबाईल
सागर वाघ १ गावठी कट्टे, २ काडतुसे, एक मोबाईल
दीपक पोळ मोबाईल
पंकज चंद्रकांत वानखेडे २ मोबाईल
विनोद सोपान तांबे मोबाईल
अजीम अल्ताफ शेख मोबाईल
करण जेऊघाले मोबाईल
लासलगाव येथील पवन आनंद नेटारे मोबाईल

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -