सख्ख्या भावाने काढला भावाचा काटा, दारूच्या नशेत घडले अघटित

नाशिक : कौटुंबिक वादातून लहान भावाने आपल्या मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून निर्गुण पणे खून केल्याची घटना नवीन नाशिक मधील कामटवाडे परिसरातील गोपाल चौक येथे घडली आहे. सोबतच दारू पिऊन घरी आल्यानंतर दोघांमध्ये जुना वाद उफाळून आला. यात लहान भावाने मोठ्या भावाचा डोक्यात लाकडी दांडक्याने हल्ला करून खून केलाय.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय संशयित आरोपी हरी दामू निकम हा गुरुवारी (दि.४)  रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मद्यपान करून घरी आला. ५० वर्षीय मोठा भाऊ सदाशिव दामू निकम यांना शिवीगाळ करू लागला त्याचा जाब विचारला असता संशयित आरोपी हरी दामू निकम याने आपल्या सख्या मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांड्याने जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. या सदाशिव निकम हे जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी त्वरित जिल्हा रुग्णात दाखल करण्यात आले.

मात्र, जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले दरम्यान घटनेची माहिती करताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

आरोपीला तात्काळ अटक

या प्रकरणी फिर्यादी बायडी कैलास सूर्यवंशी राहणार गोपाल चौक यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी हरी दामू निकम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहेत.