घरमहाराष्ट्रनाशिकसर्व्हर बंदमुळे शहरातील मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार महिनाभरापासून ठप्प

सर्व्हर बंदमुळे शहरातील मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार महिनाभरापासून ठप्प

Subscribe

रिअल इस्टेट क्षेत्रावर आधीच मंदिचे सावट असताना आता शहर व ग्रामीण भागातील दुय्यम निबंधक कार्यालयातील खरेदीविक्रीचे व्यवहार आणखी महिनाभर ठप्प राहणार आहेत. खरेदी विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी करणार्‍या निबंधक कार्यालयांचे राज्यभरातील सर्व्हर बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे जुन्या खरेदी विक्री व्यवहाराच्या दुय्यम प्रती मिळत नाहीत. यामुळे मुंबई व मुंबई उपनगर वगळता इतर ठिकाणचे व्यवहार नोंदणी थांबविण्यात आली आहे.

शहर व ग्रामीण भागातील जागा, फ्लॅट, प्लॉट, जमीन आदी खरेदी विक्रीच्या व्यवहारांची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयात होते. दुय्यम निबंधक कार्यालयाकडे १९८५ ते २००२ पर्यंत झालेल्या खरेदी विक्री व्यवहारांची कागदोपत्री नोंद झाली. हे सर्व कागदपत्र आता स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करण्याचे काम प्रगतिपथावर असल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाचा सर्व्हर १५ दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे २०१२ ते जानेवारी २०१९ पर्यंत सर्व मिळकतींच्या दस्तांची दुय्यम प्रत नागरीकांना मिळत नाही. यामुळे पुढील खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प आहेत. १९८५ ते २००२ पर्यंत झालेल्या सर्व कागदपत्रांची नोंद ही कागदोपत्री झाली आहे. हे सर्व कागदपत्र आता स्कॅन करुन ऑनलाइन अपलोड करण्याचे काम प्रगतिपथावर असल्यामुळे पुढील पंधरा दिवस सर्व्हर बंद राहणार असल्याने या कालावधीतील व्यवहार प्रभावीत होण्याची शक्यता आहे. नाशिक शहरात सध्या सात दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये खरेदी विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी होते. या सर्व कार्यालयांमध्ये याविषयी नोटीस लावण्यात आली असून, नागरीकांना १५ जानेवारीपर्यंत दिलेली मुदत संपुष्टात आल्याने त्यांनी पुन्हा विचारणा सुरू केली आहे.

सर्व नोंदी एका क्लिकवर

गेल्या तीस वर्षांतील जमीन, घर, फ्लॅट्, प्लॉट आदींच्या व्यवहारांची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात झाली आहे. मात्र, मिळकत धारकाने दुय्यम प्रत मिळवण्यासाठी अर्ज केल्यास त्यास तीन ते चार दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे व्यवहार प्रभावीत होतात आणि अपडेटेड माहिती मिळकत धारकास मिळत नाही. यावर उपाय म्हणून १९८५ पासूनची सर्व कागदपत्रे क्लाउडवर अपडेट केली जात आहेत. परिणामी नागरिकांना आपल्या सर्व नोंदी एका क्लिकवर मिळतील. या सर्व प्रक्रियेसाठी साधारणत: चार महिन्यांचा अवधी लागेल.

- Advertisement -

पथदर्शी प्रकल्प

खरेदी विक्रीचे संपूर्ण दस्त (कागदपत्र) ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी अपलोडींगचे काम सुरू झाले आहे. नाशिक विभागाचा पथदर्शी प्रकल्प देवळा, सुरगाणा, पेठ व कळवण या तालुक्यांमध्ये राबविला जाणार आहे. येत्या महिनाभरात येथील खरेदी विक्रीचे व्यवहारांमध्ये सुसूत्रता येणार आहे.

१५ दिवस सर्व्हर बंदची शक्यता

दुय्यम निबंधक कार्यालयाकडे १९८५ ते २००२ पर्यंत नोंद झालेल्या खरेदी विक्री व्यवहारांचे दस्त स्कॅन करून क्लाउडवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस सर्व्हर बंद राहाण्याची शक्यता आहे.
सरिता नरके, मुद्रांक उपमहानिरीक्षक, नाशिक विभाग.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -