घरमहाराष्ट्रनाशिक‘यमुना एक्सप्रेस वे’च्या धर्तीवर ‘समृद्धी’

‘यमुना एक्सप्रेस वे’च्या धर्तीवर ‘समृद्धी’

Subscribe

महाराष्ट्र रस्ते विकास अधिकार्‍यांचा पाहणी दौरा

ग्रेटर नोएडा ते आग्रा दरम्यान १६५ किलोमीटर लांबींच्या यमुना एक्सप्रेसवेची महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, तांत्रिक सल्लागार समिती आणि ज्या जिल्ह्यांतून हा मार्ग जाणार आहे तेथील सर्व उपजिल्हाधिकार्‍यांसह प्रतिनीधींनी यमुना एक्सप्रेस वे आणि लखनऊ एक्सप्रेस वे चा अभ्यास दौरा करत महामार्गावर उपलब्ध सोयी-सुविधांबाबत माहिती घेतली.
राज्यात दळणवळण सुविधा, उद्योग, व्यापाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नागपुर मुंबई या ७१० किलोमीटरच्या समृध्दी महामार्ग साकारण्यात येणार आहे. राज्यातील १० जिल्हे, जवळपास २६ तालुके व ३९२ गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे.

नाशिक जिल्हयातील सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गासाठी जमीनीचे भुसंपादन जवळपास पुर्ण करण्यात आले असून १६ पॅकेजेसमध्ये करण्यात येणारया या महामार्गाचे कामही सुरू करण्यात आले आहे. ग्रीन फिल्ड कॉरिडोर हे समृद्धी महामार्गाचे वैशिष्ट्य असणार आहे. या महामार्गावर अतिरिक्त आणखी काही सुविधा देता येतील या करीता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधिकार्‍यांच्या टीमने सर्व उपजिल्हाधिकार्‍यांसह ग्रेटर नोएडा ते आग्रा यमुना एक्सप्रेस वे आणि लखनउ ते आगरा एक्सप्रेसवेचा अभ्यास दौरा केला. या पथकाने या महामार्गावरून प्रवास करत प्रत्यक्ष सुविधांची पाहणी केली. यावेळी यमुना प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेंद्र भाटीया यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. या अभ्यास दौर्‍याचा अहवाल तयार करण्यात येउन येथील काही सुविधा समृध्दी महामार्गावर निर्माण करता येतील का याचा अभ्यास करण्यात येणार आहे तसेच राज्यातील विविध प्रस्तावित एक्सप्रेसवे प्रकल्पाकरीता याचा फायदा होईल. तसेच समृध्दी महामार्गाचे काम करतांना अधिकच्या काही सुविधा उपलब्ध करून देता येतील का याचाही अभ्यास या दौरयात करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी विठठल सोनवणे यांनी सांगितले.

- Advertisement -

या बाबींचा अभ्यास

या एक्सप्रेसवर देण्यात आलेल्या जनसुविधा, टोल प्लाझाचे नियोजन, ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम, महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजना, भुसंपादन करतांना आलेल्या अडचणी आदि बाबींचा यावेळी अभ्यास करण्यात आला. तसेच महामार्गावर ७ इंटरचेंजेस, ३५ अंडरपास, ४५ छोटे मार्ग, इंटरचेंज लुपवर ७ टोल प्लाझा, १ रेल्वे ओव्हर ब्रिज निर्माण करण्यात आला असून अधिकार्‍यांनी या सर्व ठिकाणांना भेटी देवून पाहणी केली.

महामार्गाची वैशिष्टै

१६५ किलोमीटरच्या या एस्प्रेसवे वर तीन टोल प्लाझा असून येथेच जनसुविधा केंद्र, प्रवासी शयन कक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र, मदत कक्ष, प्रसाधनगृह आदि सुविधा देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -