घरमहाराष्ट्रनाशिकसमृद्धी आंदोलन प्रकरणी राजकीय द्वेषातून गुन्हे

समृद्धी आंदोलन प्रकरणी राजकीय द्वेषातून गुन्हे

Subscribe

पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांचा आरोप

नाशिक महामार्गासाठी जमिनी देण्यावरून शेतकर्‍यांत असंतोष होता. या दरम्यान २०१७ मध्ये शेतकर्‍यांना भेटण्यासाठी गेलेल्या शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यामागे निवडणुकीचे राजकारण आहे. या काळात इतर हजारो नेते शिवडीच्या परिसरात आले होते. त्या इतरांवर का गुन्हे दाखल केले नाहीत, असा सवालही पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. दोन वर्षांनंतर केवळ निवडणुकीच्या तोंडावर अडवणूक करण्याचे हे सरकारचे कारस्थान आहे. ही अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपीच असल्याचे सांगत सरकारच्या या कृतीचा यावेळी निषेधही करण्यात आला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, किसान सभेचे कार्याध्यक्ष राजू देसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या अमृता पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, आम आदमी पक्षाचे अ‍ॅड. प्रभाकर वायचळे, मराठा महासंघाचे चंद्रकांत बनकर, प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तू बोडके, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समाधान भारतीय, व्ही.डी. धनवटे, नितीन रोठे पाटील, संजय फडोळ, योगेश कापसे, अनिल भडांगे, महादेव खुडे, शरद लभडे, विजय दराडे उपस्थित होते.

- Advertisement -

७ एप्रिल २०१७ ला शिवडे येथे पोलीस व शेतकर्‍यांमध्ये संघर्ष झाला होता. त्यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनीही शिवडे गावात जाऊन शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेत संवाद साधला होता. तसेच पाठिंबाही दिला होता. या काळात खासदार राजू शेट्टी यांनीही शेतकर्‍यांची भेट घेऊन संवाद साधला होता. शेट्टींसह शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले, सोमनाथ वाघ, हंसराज वडघुले, अनिल काकड यांच्यासह नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. याची माहिती २४ मार्च २०१९ ला मिळाली आहे. राज्यात शासन आंदोलकांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावीत, अशी मागणीही केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -