घरमहाराष्ट्रनाशिकसंजय राऊत हे जिहाद्यांचे एजंट आहेत का? तुषार भोसलेंचा हल्लाबोल

संजय राऊत हे जिहाद्यांचे एजंट आहेत का? तुषार भोसलेंचा हल्लाबोल

Subscribe

नाशिका : त्र्यंबकेश्वर प्रकरणी (Trimbakeshwar case) वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंदिरामध्ये संदलची धूप दाखवण्याची 100 वर्षांची परंपरा आहे, अशी भूमिका मांडली होती. या वक्तव्यावर उत्तर देण्यासाठी भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosle) यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर जिहाद्यांचे एजंट असल्याचा गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे.

तुषार भोसले म्हणाले की, त्र्यंबकेश्वर प्रकरणी अनेक लोकांनी रान पेटवले. अनेक लोकांनी दावे करत सलोखा, सौहार्द्याची अनेक उदाहरणे दाखवली. पण ज्या अर्थी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ एसआयटी नेमली आणि गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याचा अर्थ गृहखात्याकडे या संदर्भात इनपुट असतील यात काही शंका नाही, असे म्हणत त्यांनी एक जुना व्हिडिओ दाखवला. त्यांनी व्हिडिओ दाखवला.

- Advertisement -

हा व्हिडिओ दाखवताना तुषार भोसले यांनी दावा केला की, त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात धूप दाखवतानाचा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे. त्यात व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीनं दावा केला की, मागच्या वर्षी आम्ही मंदिरात गेलो होतो तर मग आत्ता आम्हाला का अडवण्यात आले. पण ही व्यक्ती त्र्यंबकेश्वर वाद प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार लोकांपैकी एक मुख्य आरोपी आहे. सलमान सय्यद हा आरोपी एक गुन्हेगार असून त्याने 2018 मध्ये एका अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केले आहे. त्याच्यावर पोक्सोसह विविध गुन्हेगारी कलमे दाखल करण्यात आली आहेत. या व्यक्तीवर नाशिकच्या न्यायालयात खटला सुरु आहे. याची सगळी माहिती एसआयटीकडे देण्यात येणार असून उरुस आयोजकांमध्ये जे लोक सहभागी होते ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यापैकी काही ड्रग्ज सप्लायर, हत्यारांचे पुरवठादार आहेत. याची खात्री करण्यासाठी आम्ही सगळी माहिती एसआयटीकडे देणार आहोत, अशी माहिती तुषार भोसले यांनी दिली.

राऊत जिहाद्यांचे एजंट असल्याचा गंभीर आरोप
तुषार भोसले यांनी सांगितले की, त्र्यंबकेश्वर प्रकरणाला काही लोक देत आहेत, तर संजय राऊत यांनी १०० वर्षांची परंपरा असल्याचे म्हटले. पण संजय राऊत आयएसआयच्या एजंटला लाजवेल असे कृत्य करत आहेत. राऊत हे जिहाद्यांचे एजंट आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी गंभीर आरोप केला आहे. तुषार भोसले म्हणाले की, आमच्या गावात मंदिरात धुप दाखवण्याची कुठलीही परंपरा नाही. यासाठी त्र्यंबकेश्वरवासियांनी एक स्वाक्षरी मोहिम चालवली आहे. याची माहिती एसआयटीला देण्यात येणार असल्याचेही तुषार भोसले यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -