घरमहाराष्ट्रनाशिकवाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची.

वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची.

Subscribe

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपरोधिक सदिच्छा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात वाघाच्या मैत्रीवरुन जोरदार वाक्युद्ध रंगले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यास आम्ही वाघाशी म्हणजेच शिवसेनेशी मैत्री करायला तयार आहे, असे सुचक वक्तव्य चंद्रकांत पाटील म्हणाले होते. वाघाशी कुणी मैत्री करत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. आम्ही जंगलातील वाघाशी मैत्री करतो, पिंजर्‍यातील वाघाशी नाही, असा टोला लगावला. मात्र धुळे जिल्हयाच्या दौर्‍यावर असलेल्या खा. राऊत यांनी चंद्रकांत पाटील हे लहान मुलासारखे आहे, आनंद घ्या, मुळात वाघाने खेळवले आणि लोळवले आहे, अशा शब्दांत सणसणीत टोला लगावला त्यामुळे गुरूवारी राऊत विरूध्द चंद्रकांतदादा यांच्यात राजकिय सामना रंगल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत गुप्तगू बैठक झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलेले असताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, असा सदिच्छा दिल्या आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपचे सूत जुळते की काय, या चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

उत्तर महाराष्ट्राच्या पाच दिवशीय दौर्‍यावर आलेले संजय राऊत यांनी गुरुवारी (दि.10) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेवून विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, वाघाशी दोस्ती करावी यासाठी मला वाघ भेट दिला, पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींशी जुनी मैत्री आहे. इकडे दोस्ती असती तर 18 महिन्यांपूर्वीच सरकार स्थापन झाले असते, असेही राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी हे भाजपा आणि देशाचे मोठे नेते आहेत. जे यश भाजपला प्राप्त झाले ते त्यांच्या नेतृत्वामुळेच आहे. पण पंतप्रधान हे देशाचे असतात, त्यांनी राजकीय प्रचार करु नये. कोणत्याही पक्षाचा प्रचार करु नये. ते देशाचे पंतप्रधान आहेत. फोटो वापरणे हे कार्यकर्त्यांवर असते. बाळासाहेबांचा फोटो वापरला जातो, वाजपेयींचा वापरा जात होता. हे असं ठरवून होत नाही, लोकांच्या मनात तो नेता असतो, असं संजय राऊत म्हणाले.

विधानसभेला 100 पार

प्रत्येक पक्षाचे लक्ष विधानसभेच्या जागांवर असते. आम्हालाही वाटतं की आमचा आकडा विधानसभेवर 100 पार असावा. त्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. महाविकास आघाडीचे तिनही पक्ष आपआपल्या पक्षासाठी काम करताहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -