घरमहाराष्ट्रनाशिकसंजय राऊत नाशकात येताच फरार शिवसैनिक पोलिसांना शरण

संजय राऊत नाशकात येताच फरार शिवसैनिक पोलिसांना शरण

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काही शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टीच्या वसंत स्मृती कार्यालयालयावर हल्ला केला होता. त्यानंतर संबंधित शिवसैनिक फरार होते. शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत नाशकात दाखल होताच ही फरार मंडळी पोलिसांना शरण आली.

शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली. यात कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फुटल्या. त्यानंतर दगडफेक करणारे नगरसेवक दीपक दातीर, बाळासाहेब दराडे फरार होते. या कार्यकर्त्यांचा शोध घेऊन अटक करण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना तीन वेळा निवेदन दिले. मात्र शनिवारी खा. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन पोलीस आयुक्तांची भेट घेताच संबंधित फरार मंडळींनी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय चांगले अधिकारी आहेत. अशा अधिकार्‍यांना मला भेटायला मला आवडते, असे खा. राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

संजय राऊत नाशकात येताच फरार शिवसैनिक पोलिसांना शरण
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -