फाळके स्मारकाच्या भेटीनंतर संजय राऊतांनी केलं महत्त्वाचं विधान

फाळके स्मारक येथे सिनेसृष्टी उभारणार : संजय राऊत

नाशिक : शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या आणि एकेकाळी नाशिक शहरासाठी शिरपेचातील मानाचा तुरा असलेलं पण सध्या त्याकडे कुणी बघायलाही तयार नाही अश्या दादासाहेब फाळके स्मारकाला भेट दिली.

त्यावेळी त्यांनी या इतक्या मोठ्या भव्य जागेमध्ये दादासाहेब फाळके यांच्या नावाला साजेस रामोजीच्या धर्तीवर भव्य-दिव्य सिनेसृष्टी  उभी राहू शकते असे मत व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समवेत महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त रमेश पवार हे देखील उपस्थित होते.

त्यावेळी राऊत यांनी आपल्या सोबत असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना फाळके स्मारक बद्दल सांगतांना पूर्वी नाशिकला आल्यानंतर ते स्मारकात मॉर्निग वॉक साठी येत असत याची आठवण करून दिली. तसेच या ठिकाणी अजून कुठल्या कुठल्या गोष्टी होऊ शकतात याबाबतही पाहणी दरम्यान चर्चा केली.

पालिका आयुक हे खूप कर्तव्यदक्ष अधिकारी असून ये नक्कीच या स्मारकास सुस्थितीत आणून यास पुनरवैभव प्राप्त करून देतील असा विश्वास व्यक्त करतानाच, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीही याबाबत चर्चा करून फाळके स्मारक येथे पर्यटन विकासाच्या दृष्टीने काय करता येईल याबाबत चर्चा करणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.