घरमहाराष्ट्रनाशिकबाजारात संक्रांतीचा नवा ट्रेंड; चांदीच्या पतंगीला ग्राहकांची पसंती

बाजारात संक्रांतीचा नवा ट्रेंड; चांदीच्या पतंगीला ग्राहकांची पसंती

Subscribe

रोप, कुंडी, कापडी बॅगा, पर्स यांसह चांदीच्या छोट्या वस्तूंचा समावेश

नाशिक : अवघ्या एक दिवसावर मकरसंक्रांत सण आल्याने बाजारपेठेत वाण खरेदीसाठी ग्राहक गर्दी करू लागले आहेत. यंदा बाजारपेठेत नवा ट्रेंड आला असून, चांदीच्या पतंग व चक्रीला ग्राहकांची पसंती मिळत आहे. जावयांसह नातेवाईकांना वाण खरेदीसाठी चांदीच्या वस्तूंना सर्वाधिक पसंती मिळते आहे.

मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला हळदी-कुंकू समारंभाचे आयोजित करतात. त्यानिमित्त भेटवस्तू दिल्या जातात. शिवाय, सासरची मंडळी जावई व नातेवाईकाला वाण म्हणून भेटवस्तू देतात. काळानुरुप प्रथांमध्ये बदल झाला. ग्राहकांना आकर्षक वाण खरेदी करता यावे, यासाठी सराफ व्यावसायिकांसह दुकानदारांनी विविध आकारातील भेटवस्तू विक्रीस ठेवल्या आहेत.

- Advertisement -

यात रोप, कुंडी, कापडी बॅगा, पर्स यांसह चांदीच्या छोट्या वस्तूंचा समावेश आहे. यंदा सराफ बाजारात चांदीच्या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. त्यात चांदीचा चमचा, वाटी, फुलपात्र, पतंग व चक्रीचा समावेश आहे. चांदीची पतंग व चक्री ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. काही ग्राहकांच्या मागणीनुसार कारागिरांनी पतंग व चक्री तयार केल्या आहेत. त्यावर कारागिरांनी सुरेक्ष नक्षीकामसुद्धा केले आहे. ते ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

मकरसंक्रांत सणात हळदी-कुंकवाच्या वाणासाठी चांदीच्या वस्तू जावयांसह नातेवाईकांना भेट दिल्या जातात. चांदीची पतंग व चक्री बाराशे रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहे. या वस्तूंना ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे.
गिरीश नवसे, अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -