Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र संत निवृत्तीनाथ मंदिर दानपेटीचा वाद धर्मादाय आयुक्तांच्या कोर्टात

संत निवृत्तीनाथ मंदिर दानपेटीचा वाद धर्मादाय आयुक्तांच्या कोर्टात

Subscribe

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज देवस्थान वादात अडकले आहे. मंदिरातील दानपेटीतील उत्पन्नावरून वादाला सुरुवात झाली आहे. दान पेटीतून मंदिराच्या पुजार्‍यांना मिळणारे उत्पन्न बंद करण्याची मागणी वारकरी प्रतिनिधींनी केली असून हा वाद धर्मदाय आयुक्त कार्यालयात गेला आहे. तर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे देवस्थानचा कारभार सुरू असल्याचा पुजार्‍यांचा दावा आहे.

भागवत धर्माची पताका फडकविणारे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी मंदिर नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. वर्षोनुवर्षे वंश परंपरेनुसार गोसावी कुटुंब मंदिराची देखभाल, नित्य पूजा करत आहेत. आधी गोसावी कुटुंबीय सर्व कारभार बघायचे. मात्र कालांतराने विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली. दानपेटीतील मिळणार्‍या उत्पन्नातून 40 टक्के वाटा गोसावी कुटुंबीयांना तर 60 टक्के वाटा देवस्थान ट्रस्टला दिला जातो. ट्रस्टकडून वार्षिक सण उत्सव, पालखी सोहळे, वीज बिलासह इतर प्रशासकीय खर्च पार पडले जातात. तर गोसावी कुटूंबीयांकडून देवाची नित्य पूजा, नैवेद्य, विणेकरी, पहारेकरी यांची भोजन व्यवस्था आणि इतर काम केली जातात.

- Advertisement -

दरम्यान, दानपेटीतून मिळणार्‍या उत्पन्नात वाटेकरी असल्याने देवस्थानच्या ठेवी नाही, उत्पन्नपेक्षा ट्रस्टचा खर्च जास्त होत आहे. पालखी मार्गात मिळणार्‍या धान्यात देवस्थानचा वाटा नाही, अशी ओरड काही विश्वस्त आणि वारकरी प्रतिनिधींनी केली होती. धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून देवस्थानच्या ठरावात बदल करून पुजार्‍याना मिळणारे उत्पन्न बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाविकांच्या मिळणार्‍या दानाच्या रकमेतून दोन्ही बाजूचा खर्च केला जातो. या संदर्भात 2008, 2014 मध्ये देखील वाद निर्माण झाला होता. प्रकरण तेव्हाही न्यायालयात गेले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसारच 60- 40 टक्क्यांचा फॉर्मुला ठरला असल्याचा पुजार्‍यांचा दावा आहे.

… तर न्यायालयात दाद मागणार

संत निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या सेवेसाठी अहोरात्र झटत असताना गोसावी कुटुंबियांनी वडिलोपार्जित जागाही देवस्थानच्या कामासाठी दिल्या आहेत. वंशपरंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराज, पेशवेकालीन, ब्रिटिशकालीन सनद असल्याचा दावा या कटुंबियांकडून होतो. उत्पन्नावरून निरर्थक वाद सूरु असून कोणाला आक्षेप घ्यायचा असेल तर न्यायालयात दाद मागण्याचे आव्हान गोसावी कुटुंबियांकडून केले जात आहे. दरम्यान देवस्थानच्या जीर्णोद्धाराचे काम जोमाने सुरु आहे. भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रसाद योजनेबरोबरच जीर्णोद्धारासाठी निधी संकलित केला जात आहे. मंदिर नवे रूप धारण करत असतानाच वादाचे ग्रहण लागले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -