घरमहाराष्ट्रनाशिकसप्तशृंगगड : २४ तास दर्शन सुविधा सुरू मात्र प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा भाविकांना फटका

सप्तशृंगगड : २४ तास दर्शन सुविधा सुरू मात्र प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा भाविकांना फटका

Subscribe

सप्तशृंगगड : साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध स्वयंभू असलेल्या व लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर दिवाळी सुट्टीची पर्वणी साधत भाविकांनी सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी तोबा गर्दी केली आहे. त्यामुळे गडाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. फनिक्यूलर रोपवे ट्रॉलीचा प्रवासही आकर्षण ठरत आहे. गुजरात, जळगाव, मुंबई, धुळे, पुणे, इंदैार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या सारख्या अनेक ठिकाणच्या भाविकांची गर्दी पाहावयास मिळत आहे जय मातादीच्या घोषणांनी सप्तशृंग गड दुमदुमून गेला आहे. ही गर्दी लक्षात घेऊन ट्रस्टने देवीचे दर्शन २४ तास खुले ठेवले आहे. दिवाळीनिमित्त २४ तास मंदिर सुरू असल्यामुळे लाखो भाविक गडावर आदिमाया सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दिवाळीच्या सुट्या साधत गडावर भाविकांची गर्दी उसळली असून, चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव व यात्रेप्रमाणेच दिवाळी यात्रेचे स्वरूप आले आहे. आठ दिवसांत गडावर लाखो भाविक देवीचरणी नतमस्तक झाले.

खानदेशातील पण गुजरातमध्ये स्थायिक झालेल्या भाविकांबरोबरच गुजरात व महाराष्ट्रातील भाविक दिवाळीच्या सुटीचा योग साधून गडावर दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. भाऊबीजेनंतर २६ ऑक्टोबरपासून गडावर भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे. दिवाळी संपताच गुजरातमधील हजारो भाविक पदयात्रेने शिर्डीलाजात असतांना प्रथम सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन त्यानंतर शिर्डीकडे मार्गस्थ होतात आज रविवार व दिवाळीतील सुटीची संधी साधत सकाळपासून भाविकांची गर्दी उसळल्याने मंदिरापासून पहिल्या टप्प्यापर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी बार्‍या लागल्या होत्या. अंबेमाते की जय’चा जयघोष करीत भक्तांना २ ते ३ तासाच्या प्रतीक्षेनंतर दर्शन होत होते. दरम्यान चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवाप्रमाणेच भाविकांना सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी न्यासाची श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट प्रशासकीय व कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

- Advertisement -

परंतु गर्दीवर नियंत्रण मिळवणे पोलिस प्रशासनाला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. एसटी महामंडळाच्या नियोजन शून्यतेमुळे सप्तशृंग गडावर भाविकांचे प्रचंड हाल होत आहे. एसटी बसेस कमी असल्याने व गडावरुन खाली उतरण्याकरीत सायंकाळी साडेपाचची शेवटची बस असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. साडेपाचनंतर नांदुरीला जाण्यासाठी बसच उपलब्ध नसल्याने खाजगी वाहतूकदारांची चंगळ होत आहे. अव्वाचे सव्वा भाडे आकारून भाविकांची अक्षरशः लूट केली जात आहे. पहिल्या पायरीच्या दर्शनाचे समाधान भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी ट्रस्टकडून टप्प्याटप्प्याने भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहने पार्क करायला जागा नसल्यामुळे अनेकजण जिथे जागा मिळेल तिथे आपली वाहने लावत होते. रोपवे गेटच्या समोर येथील दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. गडावर दर्शनाला येणानार्‍या भाविकांना २ ते ३ किलोमीटर गाडी लांब लावून पायी प्रवास करून भगवतीच्या दर्शनाला यावं लागत आहे. गर्दी लक्षात घेऊन गडावर खासगी वाहनांसाठी वाहनतळ व पोलिस बंदोबस्त अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

सुरक्षा भगवतीच्याच हाती गर्दीवर नियंत्रण सुरक्षिततेच्या न्यासाचे सुरक्षा कर्मचारी न्यासाच्या कार्यक्षेत्रात तैनात असले तरी इतर ठिकाणी पोलिस यंत्रणा पुरेशा प्रभागात कार्यरत नसल्याने भाविकांची सुरक्षा भगवतीच्या हातीच असल्याचे चित्र आहे. चैत्रत्सव नवरात्रोतसवात खामगी वाहनांना बंदी असते गडावर त्यामुळे वाहतूक कोंडी होत नाही. परंतु इतर वेळी गडावर खासगी वाहनांची गर्दा होऊन ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते. दरम्यान, सुटीमुळे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांण मुळे व खाजगी वाहनांच्या चुकीच्या पार्किंग मुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा सप्तशृंग गडावरती दिसून येत आहे.

- Advertisement -
बसची सख्या वाढणे गरजेचे

भाविकांची गर्दी लक्षात घेता ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास दर्शनासाठी मंदिर उपलब्ध केले आहे. त्यानुसार भाविकांची संख्या लक्षात घेत एसटी व्यवस्थापनाने अतिरिक्त बसचे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र भाविकांची संख्या जास्त असल्यामुळे एसटीचे नियोजन फसले आहे. त्यातच सायंकाळी सातनंतर बसव नसल्याने सायंकाळी उशिरा व रात्री गुजरात व विविध ठिकाणांहून येणार्‍या भाविकांची एसटीअभावी गैरसोय होत आहे. भाविकांना अव्वाच्या सच्चा भाडे द्यावे लागत असल्याने खासगी वाहनधारकांची मात्र लागलीच दिवाळी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -