घरमहाराष्ट्रनाशिकऑक्टोबरमध्ये रंगणार सप्तश्रृंगी हिल मॅरेथॉन

ऑक्टोबरमध्ये रंगणार सप्तश्रृंगी हिल मॅरेथॉन

Subscribe

नाशिक रनर्सचा प्रेरणादायी उपक्रम, आरोग्याबाबत जनजागृतीसाठी डॉक्टरांचा पुढाकार, १ ऑगस्टपासून नावनोंदणी

आरोग्याप्रती जागरुकता निर्माण होतानाच ग्रामीण व आदिवासी भागातील तरुणांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये धावण्याची संधी मिळावी, या हेतूने नाशिक रनर्स संस्थेच्या वतीने २० ऑक्टोबर रोजी सप्तश्रृंगी हिल मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाची घोषणा पर्यटन विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, श्री सप्तश्रृंगी देवी संस्थानचे विश्वस्त नाना सूर्यवंशी आणि संस्थेचे अध्यक्ष नारायण वाघ यांनी शुक्रवारी केली.

थत्ते नगर येथील संस्थेच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. पाच, दहा आणि २१ किलोमीटर अशा तीन टप्प्यांत ही मॅरेथॉन होणार आहे. नांदुरी गडाच्या पायथ्यापासून सकाळी ६.३० वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. नांदुरी गड ते शीतकडा पर्यंत आणि परत पायथ्यापर्यंत हा मॅरेथॉनचा संपूर्ण मार्ग २१ किलोमीटरचा आहे. वेगवेगळ्या अंतरामुळे यात आबालवृद्धांना सहभागाची संधी मिळणार आहे. स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष असून, यापूर्वीच्या दोन्हीही मॅरेथॉनप्रमाणेच आताही उदंड प्रतिसाद लाभेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या उपक्रमात सहभागासाठी १ ऑगस्टपासून नावनोंदणी सुरू होईल. अधिकाधिक व्यक्तींनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले. पत्रकार परिषदेप्रसंगी संस्थेचे रेस डायरेक्टर तथा आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, उपाध्यक्ष मिलिंद शहा, सचिव महिंद्र छोरिया उपस्थित होते. उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी विनोद गोऱ्हे यांच्याशी ९८२२२७४८९९ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

नावनोंदणीसाठी संपर्क

मेट्रो ९९, येस बँक इमारत, थत्ते नगर, कॉलेजरोड किंवा साई स्पोर्ट्स, कॅनडा कॉर्नर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -