Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम सराफ खून प्रकरण: संशयित आरोपी लपला होता नाशिकमध्ये

सराफ खून प्रकरण: संशयित आरोपी लपला होता नाशिकमध्ये

लग्नानिमित्त सोने खरेदीचे आमिष दाखवून ८ लाख ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लुटला होता

Related Story

- Advertisement -

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील सराफी व्यावसायिक विशाल सुभाष कुलथे यांच्या अपहरण व हत्येतील मुख्य संशयितास पत्नीसह गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने बुधवारी (दि.२) नाशिकरोडमधील अरिंगळे मळा परिसरातून अटक केली. ज्ञानेश्वर ऊर्फ भैय्या शिवाजी गायकवाड, पत्नी अंजली गायकवाड (२०) अशी त्यांची नावे आहेत.

लग्नानिमित्त सोने खरेदीचे आमिष दाखवून सराफ व्यावसायिक विशाल कुलथे यास केशकर्तनालयात बोलावून ११ तोळे सोने व चार किलो वजनाचे चांदीचे दागिने असा ८ लाख ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लुटत त्यांचा २० मे २०२१ रोजी खून करण्यात आल्याची घटना घडली होती. हत्येनंतर कुलथे यांचा मृतदेह शेतात पुरण्यात आला होता. बीड जिल्ह्यात खून केल्यानंतर मृतदेह अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात आणून पुरण्यात आला होता. तेव्हापासून मुख्य आरोपी ज्ञानेश्वर फरार होता. नाशिक शहर पोलिसांना तो नाशिकमध्ये असल्याचे समजले. त्यानुसार दोघांना ताब्यात घेत बीड पोलिसांच्या स्वाधीन केले गेले.

लॉकडाऊननंतर सराफ व्यावसायिकांवर हल्ले करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. राज्यात लॉकडाऊनमध्ये 100 हून अधिक दरोडे पडले असून, 8 सराफ व्यावसायिकांना जीव गमवावा लागला. बीडमधील घटना निंदनीय व क्रूर आहे. आरोपींना अटक झाल्याने पुढील घटनांना जरब बसणार आहे. अटक करणार्‍या नाशिक गुन्हे शाखेच्या कामगिरीने नाशिक पोलिसांचे नाव उंचावले आहे.
– चेतन राजापूरकर, डायरेक्टर, महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंडिया बुलीयन अँड ज्वेलर्स असोसिएशन

- Advertisement -