Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम सराईत दुचाकी चोर गजाआड; ५ दुचाकी जप्त

सराईत दुचाकी चोर गजाआड; ५ दुचाकी जप्त

गंगापूर पोलिसांनी सापळा रचून केली अटक

Related Story

- Advertisement -

शहर पोलीस हद्दीतील गंगापूर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी चोरीच्या पाच दुचाकी चांदशी, कळवण व साक्री येथून ताब्यात घेतल्या आहेत. राकेश शिवाजी अहिरे (वय ३५, रा. चांदशी, नाशिक), प्रवीण सदाशिव जगताप ( वय ४१, रा. मोरे मळा, गंगापूर रोड, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस नाईक रवींद्र मोहिते यांना चोरीच्या दुचाकींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता दोघांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी चांदशीतून एक, कळवण येथून दोन आणि साक्री येथून दोन असा एकूण पाच दुचाकी जप्त केल्या. ही कामगिरी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे, पोलीस हवालदार भरत बोळे, पोलीस नाईक रविंद्र मोहिते, गिरीश महाले, अनिल चारसकर ,पोलीस शिपाई दीपक जगताप, समाधान शिंदे यांनी केली.

- Advertisement -