घरमहाराष्ट्रनाशिकसरपंच हा अधिकारी-नागरिकांमधील सेतू

सरपंच हा अधिकारी-नागरिकांमधील सेतू

Subscribe

अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे ः सरपंच संसद परिषदेत विविध प्रश्नांवर विचारमंथन

सटाणा : गाव विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडे विविध विभागांमार्फत योजना राबवल्या जातात. त्या योजनांची परिपूर्ण माहिती ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवण्यात सरपंच हा गावाचा दुवा असतो. सरपंच हाच अधिकारी व नागरिकांसाठी सेतू असते, असे आवाहन मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी केले. शासनाकडे योजनांची कमतरता नाही. यासाठी सरपंच संसद परिषदेने पुढाकार घेतला आहे. सरपंचांनी आपल्या गावांसाठी त्याचा लाभ करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

बागलाण पंचायत समितीच्या भिकन जयाजी पाटील सभागृहात महाराष्ट्र शासन, विभागीय आयुक्तालय व एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमाने बागलाण तालुका सरपंच संसदेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास प्रांत आधिकारी बबन काकडे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, सहायक गटविकास अधिकारी हेमंत काथेपुरी, एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वयक प्रकाश महाले यांनी मार्गदर्शन केले.

- Advertisement -

सरपंच संसद परिषदेत गावागावांतील सरपंचांनी समस्यांचा पाडा वाचला. यात आखतवाडे येथील सरपंच अशोक खैरनार यांनी गावातील पाणंद (शिवार रस्ते) रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला. मातोश्री पाणंद योजना राबवण्यासाठी प्रांत अधिकारी व तहसीलदारांनी ही योजना राबवण्यासाठी सरपंचांना सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. सरपंच संसदेचे तालुका संघटक व चौगावचे सरपंच लक्ष्मण मांडवडे यांनी रेशनकार्ड जातीचे दाखले, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी गावागावांत शिबिर घेण्याची गरज व्यक्त केली.

योजनांची माहिती मिळण्यासाठी अधिकारी व सरपं़चांची महिन्यातून एकदा बैठक झाली पाहिजे, अशी अपेक्षाही मांडवडे यांनी यावेळी व्यक्त केली.सरपंच प्रमिला पवार, किरण आहीरे, संदीप मोरे, संजय पवार, राजेंद्र जाधव आदी सरपंचांनी गावांतील समस्या मांडल्या. अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी सरपंचांना मार्गदर्शन केले. सरपंचांना गावचा विकास करता यावा, यासाठी सरपंच संसदेने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

- Advertisement -

अधिकार्‍यांना भेटून गावच्या समस्या सरपंचांनी मार्गी लावून घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक एमआयटी सरपंच संसदेचे समन्वयक योगेश पाटील यांनी केले. माजी सरपंच दिलीप आहीरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सरपंच लक्ष्मण मांडवडे यांनी केले.सरपंच मधुकर चौधरी, राणी भोये, चुनीलाल ठाकरे, पोपट ठाकरे, धनंजय पवार, मुन्ना सूर्यवंशी, दीपक शेवाळे, मनीषा पवार, नामदेव पवार, हेमंत बिरारी, संगीता ठोके, भाऊसिंग पवार, केदा पगार, संदीप पवार, शानुबाई पवार, राजेंद्र जाधव, काशिनाथ ठाकरे, अश्विनी गरूड आजी-माजी सरपंच, उपसरपंच उपस्थितीत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -