घरमहाराष्ट्रनाशिकसटाण्यातील उद्योजकाच्या खुनाचा २४ तासांत छडा

सटाण्यातील उद्योजकाच्या खुनाचा २४ तासांत छडा

Subscribe

राजू सरदार यांची हत्या करणारे प्रेमीयुगुल गजाआड... खळबळ उडवून देणार्‍या उद्योजक खुनाच्या घटनेचा तपास पोलिसांनी २४ तासांत लावत प्रेयसीसह हत्या करणार्‍या प्रियकराला गजाआड केले. रवी सुरेश खलाले (३६, रा. मंगलनगर, सटाणा) याला धुळ येथून तर प्रेयसीला सटाणा येथून अटक करण्यात आली.

गुरुवारी दोधेश्वर घाटात कारमध्ये सटाण्यातील सम्राट म्युझिकलचे संचालक राजू सरदार यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी सरदार यांच्या कुटुंबियांना माहिती दिली असता सरदार यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सरदार यांच्या मोबाईल क्रमांकाची माहिती सायबर पोलिसांना दिली असता रात्री अकरा वाजता त्यांचा मोबाईल बंद झाल्याचे समोर आले. पोलिसांनी शेवटचा कॉल तपासला असता सटाण्यातील दहावीच्या वर्गात शिकणार्‍या एका विद्यार्थ्यांचा हा फोन असल्याची खात्री झाली. त्यानुसार चौकशी केली असता विद्यार्थ्याच्या मामीने त्याचा मोबाईल रात्री साडेदहा वाजता स्वत:कडे घेतला होता. यानंतर ती घराबाहेर गेली व रात्री साडेबाराच्या सुमारास परतली, अशी माहिती विद्यार्थ्याने दिली. त्यानुसार तपास करून संबंधित महिलेला ताब्यात घेत चौकशी केली असता २०१३ पासून तिचे रवी खलाले याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राजू सरदार तिला फोन करून त्रास देत असल्याची तक्रार तिने रवी खलालेकडे केली होती. त्यानंतर दोघांनी कट रचून राजू यांचा खून केल्याची कबुली या महिलेने दिली.
उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई यांसह योगेश गुंजाळ, अनूप्रिती पाटील, भाऊ पवार, नवनाथ पवार, अजय महाजन, सागर चौधरी यांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

असा शिजला कट..

रवी व त्याच्या प्रेयसीने खुनाचा कट रचला. 13 मे रोजी संबंधित महिलेने राजू सरदार यांना रात्री फोन करून बागलाण अकॅडमीजवळ बोलावले. राजू सरदार कारने तेथे पोहोचले असता ती महिलाही कारमध्ये बसली, प्रियकर रवी हा लोखंडी टामी घेऊन पाठलाग करत होता. कोळीपाडा रोडवर कार आली असता महिलेने कार उभी करण्यास सांगितले. राजू कारमधून खाली उतरचाच मागून आलेल्या रवीने टामीच्या सहायाने राजू सरदार यांच्यावर हल्ला करत खून केला. नंतर प्रयसीसोबत रवीने मृतदेह कारमधील मागील सीटवर ठेवला, तेव्हा रवीने सरदार यांची कार चालवली, तर संबंधित महिलेने पल्सर दुचाकी चालवत दोधेश्वर घाट गाठला. उतारावरून सरदार यांची कार त्यांनी मृतदेहासह ढकलून दिली. जेणेकरून अपघात वाटेल. मात्र, गाडी उतारावर एका नाल्यात अडकून पडल्याने त्यांचा बनाव फसला आणि तेथेच खून झाल्याची शंका बळावली. तेव्हा पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -