घर उत्तर महाराष्ट्र नाशिक शहरात शनिवार, रविवार वीजेला सुट्टी; दिवसभर नसेल लाईट

नाशिक शहरात शनिवार, रविवार वीजेला सुट्टी; दिवसभर नसेल लाईट

Subscribe

नाशिक : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून काही तांत्रिक कारणास्तव ९ आणि १० सप्टेंबर रोजी दोन दिवस विज पुरवठा खंडीत केला जाणार असल्याने दोन दिवस निम्मे शहर अंधारात राहणार आहे. यासंदर्भात महावितरणकडून अधिकृतरित्या नागरिकांना माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युक पारेषण कंपनीने दिलेल्या माहिती नुसार, काही अत्यंत तातडीच्या मनोरा उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील विद्युत पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येईल. किंवा वेळेत काम पूर्ण न झाल्यास वीजपुरवठा सुरू करण्यात विलंब होणार असल्याचे कंपनीने कळविले आहे. शनिवार, ९ सप्टेंबर पहाटे ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत, रविवार, १० सप्टेंबर सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजपर्यंत वीज पुरवठा खंडित असेल.

या भागांमध्ये राहणार अंधार

- Advertisement -

सामनगाव, जेलरोड, आयएसपी, शिंदे. चांदोरी, भगूर, ठाणगाव, एमआयडीसी, वावी, नांदुरी, नायगाव, विजयनगर, सिन्नर, दापूर, सोनांबे, गोपूर, ओझर, टाऊनशिप, जऊळके, आंबे हिल, दहावा मैल. जानोरी, सिडको, अंबड, पाथर्डी, त्र्यंबकेश्वर, गुरणारे, चुंचाळे, वाडीवर्‍हे, नवदुर्गा, उपनगर, गणेशवाडी पंपिंग, मेरी, तेलवाणे, तपोवन, गणेशवाडी, गंगापूर, खंबाळे, मेरी, सातपूर, आडगाव, क्रिडा संकुल, मखमलाबाद, उमराळे, ननाशी, मुंगसरा, म्हसरुळ, पंपिंग, मेरी, म्हाळसाकोरे, करंजगाव, खेडगाव, सुकेणे, रामाचे पिंपळस, नैताळे, कोकणगाव, कुंदेवाडी, वणी, सुरगाणा, बोपेगगाव, कोशंबे, कोर्‍हाटे, तळेगाव.

इथं विद्युत पुरवठा बंद होऊ शकतो…. 

दरम्यान शनिवार सकाळी पाच वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत तर रविवारी सकाळी आठ वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद असणार आहे. यात जिल्ह्यातील 132 के.व्ही. ओझर, आंडगांव, म्हसरुळ, सिन्नर, अंबड, पिंपळस, टाकळी या उपकेंद्रातून विदुयत पुरवठा केल्या जाणाऱ्या 33 के.व्ही. वाहीन्यांचा अंशत: विदयुत पुरवठा खंडित होऊ शकतो, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -