घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रचौकार सांगणं पादचार्‍याला पडलं महागात; दोघांकडून एकाला मारहाण

चौकार सांगणं पादचार्‍याला पडलं महागात; दोघांकडून एकाला मारहाण

Subscribe

क्रिकेट खेळणार्‍या तरुणाने मारलेला चेंडू चौकार की षटकार आहे, हे सांगणं एका पादचार्‍याला चांगलच महागात पडलं आहे. चौकार सांगितल्याच्या कारणातून दोघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रचना महाविद्यालय, शरणपूर रोड येथे घडली. याप्रकरणी जॉर्ज संजय साळवे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित दीपक कुर्‍हाडे, प्रणव कुर्‍हाडेंविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, जॉर्ज साळवे रचना महाविद्यालयाच्या मैदानाजवळून जात होते. त्यावेळी संशयित मैदानावर क्रिकेट खेळत होते. यावेळी संशय दीपक फलंदाजी करत होता. दरम्यान, जॉर्ज साळवे कामावरुन घराच्या दिशेने जात होते. त्यावेळी दीपकने चेंडूला बॅटने जोरात फटका मारल्याने चेंडू साळवे यांच्या दिशेने गेला. दीपकने त्यांना षटकार की चौकार असल्याचे विचारले. साळवे यांनी चौकार असल्याचे सांगितले. षटकार न सांगितल्याने दीपक व त्याचा भाऊ प्रणव यांना राग अनावर झाला. त्यांनी संगनमताने साळवे यांना मारहाण केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -