घरताज्या घडामोडी32 खातेदारांना ऑनलाइन 12 लाखांना गंडा

32 खातेदारांना ऑनलाइन 12 लाखांना गंडा

Subscribe

स्टेट बँक ऑफ इंडिया मधून बोलत असल्यास भासवत हायटेक भामट्याने 32 जणांना 11 लाख 86 हजार 63 रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी नसिफ शेख यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नसिफ शेख यांच्यासह स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 32 खातेदारांना हायटेक भामट्याने मोबाईलवर कॉल केला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड कार्यालयातून बोलत असल्याचे भासवत ओटीपी क्रमांक मागितला. खातेदारांनी त्याच्यावर विश्वास ठेवत ओटीपी क्रमांक दिला. ओटीपी क्रमांक मिळताच हायटेक भामट्याने खातेदारांच्या खात्यातून 11 लाख 86 हजार 63 रुपये लंपास केले. पुढील तपास श्रीपाद परोपकारी करत आहेत.

दुचाकीच्या धडकेत एक जखमी

भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत एकजण जखमी झाल्याची घटना लीलावती रुग्णालयामागे, विद्यानागर, मखमलाबाद येथे घडली. याप्रकरणी पंकज महाजन यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी धनंजय मारुती उगले याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, धनंजय उगले याने भरधाव वेगाने दुचाकी (एम एच 15 जी जी 4455) चालवत शौर्य महाजन यास धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर धनंजय उगले पळून गेला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेळके करत आहेत.

- Advertisement -

गळफास घेवून एकाची आत्महत्या

राहत्या घरात गळफास घेवून एकाने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अमोल आत्माराम पाळदे (३२, पाळदेमळा, देवळाली कॅम्प) असे मृताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार,  अमोल पाळदे याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही बाब भाऊ योगेश यांना समजताच त्यांनी उपचारासाठी अमोल यास कॅन्टोमेंट रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार पी. एस. डांगळे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -