घरउत्तर महाराष्ट्रलासलगावात चोरांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सात दुकान फोडली

लासलगावात चोरांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सात दुकान फोडली

Subscribe

लासलगाव : ग्रामीण भागात मागील काही दिवसात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यात सिन्नर, दिंडोरी, चांदवड याठिकाणी झालेल्या दरोड्याच्या घटना ताज्या असतानाच जिल्ह्यातील महत्वपूर्ण बाजारपेठ असलेल्या लासलगाव मध्ये चोरीची घटना समोर आली आहे. एकाच रात्रीत चोरांनी तब्बल ७ दुकाने फोडली आहेत. याआधीही शहरात दुचाकी चोरीच्याही घटना घडल्या होत्या. यामुळे शहरातील नागरिक व व्यावसायिक यांच्यात घबराट पसरली आहे. दरम्यान, ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यात दोघे इसम दुकान फोडताना दिसून येत आहेत.

सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाल्यानुसार दोन चोरट्यांनी तब्बल एक ते दीड तास धुमाकूळ घातला असून त्यांनी अगोदर मोटरसायकल देखील चोरी केलीय. त्यानंतर सात दुकानांचे शटर तोडून हजारो रुपयांची रक्कम चोरल्याची घटना दोन दुकानांमध्ये असलेल्या झाली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पहाटे स्थानिक नागरिक कोटमगाव रोड व रेल्वे स्टेशन रोडवर फिरण्यासाठी जात असताना दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याची माहिती प्रकाश छाजेड आणि संजय धाडीवाल यांना दिली त्यांनी तातडीने दुकानात येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी सीसीटीव्ही तपासले त्यात दोन चोर चोरी करताना स्पष्ट दिसून आले आहे.

- Advertisement -

लासलगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली सीसीटीव्ही वरून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे लासलगाव शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचे या घटनेवरून लक्षात येते. शहरात एकाच रात्री सात ठिकाणी दुकाने फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिल्याचे दिसत आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लासलगाव शहरात दि १९ रोजी चोरट्यांनी कोटमगाव रोड वरील तीन दुकाने तर लासलगाव ग्रामपंचायत जवळील दोन दुकाने तर स्टेशन रोडवरील खैरे कॉम्प्लेक्स येथील किराणा दुकान आणि गोडावून फोडले आहे.पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतारवर या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -