घरमहाराष्ट्रनाशिकपतंग उडवताना इमारतीवरून पडून मुलगा ठार

पतंग उडवताना इमारतीवरून पडून मुलगा ठार

Subscribe

नाशिकरोड येथील मोरे मळा भागातील एका मुलाचा शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१५) दुपारी घडली.

नाशिकरोड येथील मोरे मळा भागातील एका मुलाचा शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१५) दुपारी घडली. सुफियान निजाम कुरेशी (१६) असे या मुलाचे नाव आहे. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पतंग उडवत असताना, तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून तो खाली पडला. ही घटना लक्षात येताच त्याच्या कुटूंबीयांसह परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत सुफियानला दवाखान्यात दाखल केले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -