घरताज्या घडामोडीअखेर ठरलं! नाशिक शहरातल्या शाळांना सोमवारचा मुहूर्त

अखेर ठरलं! नाशिक शहरातल्या शाळांना सोमवारचा मुहूर्त

Subscribe

ग्रामीण भागातील शाळाविषयी शुक्रवारी होणार निर्णय

नाशिक : कोरोना संसर्ग कमी होत असल्याने शहरातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सोमवार (दि.१३) पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा कधीपासून सुरु होतील, याविषयी प्रस्ताव शुक्रवारी (दि.१०) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे.

शहरात इयत्ता सातवीपर्यंतच्या ४०५ शाळांमध्ये १ लाख ८५ हजार २७९ विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळा सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीने केलेल्या पाहणीनुसार शहरातील ६० टक्के पालकांनी शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील शाळा सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण प्रशासनाधिकारी सुनिता धनगर यांनी दिली.

- Advertisement -

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या ३ हजार २६३ शाळा आहेत. तसेच खासगी शिक्षण संस्थांच्या ६६३ आणि इंग्रजी माध्यम व इतर विभागांच्या अशा एकूण ५ हजार शाळा आहेत. या शाळांची माहिती मागवण्यात आली असून, शुक्रवारी हा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीसह जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे. शहरातील शाळा ज्या अर्थी सुरु होत आहेत त्याअर्थी ग्रामीण भागातील शाळाही सुरु होण्याची शक्यता अधिक आहे.
जिल्ह्यातील शाळांची माहिती मागवली असून, हा संपूर्ण अहवाल शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येईल. त्यांनी परवानगी दिली तर कोरोना नियमांमध्ये शाळा सुरु होतील. -राजीव म्हसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, नाशिक

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -